IPL 2025 : आयपीएलच्या पुढील हंगामासाठी चेन्नई आणि राजस्थान संघात खेळाडूंची मोठी अदलाबदल?

IPL 2025 : पुढील हंगामात संजू सॅमसन राजस्थान ऐवजी चेन्नईकडून खेळणार असल्याचं समजतंय.

82
IPL Valuation : आयपीएलचं मूल्यांकन १० टक्क्यांनी घटलं
IPL Valuation : आयपीएलचं मूल्यांकन १० टक्क्यांनी घटलं
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल २०२५ (IPL 2025) पूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. सध्याच्या संघातील फक्त चार खेळाडू फ्रँचाईजींना कायम ठेवता येतील. बाकी खेळाडू हे पुन्हा एकदा लिलावाच्या फेऱ्यातून जातील. अशावेळी संघांचीही खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रणनीती आखण्याचं काम सुरू झालं आहे. सध्या एका संभाव्य व्यवहाराची चर्चा होत आहे ती संजू सॅमसनची. पुढील हंगामात संजू सॅमसन राजस्थान ऐवजी चेन्नईकडून खेळू शकतो.

(हेही वाचा – Public Sector Undertaking : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणजे नेमकं काय? ती कशी काम करते?)

आणि ही घडामोड लिलावाऐवजीच होऊ शकते. खेळाडूंच्या अदलाबदलीचा एक मार्ग संघ मालकांकडे असेल. याला इनसाईडर ट्रेडिंग असं म्हणतात. ते कार्ड वापरून ही अदलाबदली पैशाच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून होऊ शकते. राजस्थान रॉयल्स संघानेही संजू सॅमसनच्या बदल्यात चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार खेळाडू मागितला आहे. त्याचं नाव आहे शिवम दुबे. (IPL 2025)

(हेही वाचा – Dahi Handi 2024 : ठाण्यात 55 लाखांची गोकुळ हंडी वेधणार लक्ष)

महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई संघाचा आतापर्यंतचा महत्त्वाचा खेळाडू आहे. पण, तो पुढील वर्षी अख्खी आयपीएल (IPL 2025) खेळण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय तो निवृत्तीचाही विचार करत आहे. अशावेळी धोणीच्या अनुपस्थितीत चेन्नईला हवा आहे तगडा यष्टीरक्षक फलंदाज. त्यासाठी संजू सॅमसनसाठी त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. अर्थात, हा करार नेमका कसा पार पडणार किंवा त्यासाठी दोन्ही संघ काही आर्थिक देवाण घेवाण करणार की नाही, हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. शिवाय बीसीसीआय किंवा दोन्ही फ्रँचाईजींनी अजून या बातमीला अधिकृत दुजेरा दिलेला नाही. पण, अनधिकृतपणे या कराराची चर्चा आधीच सुरू झाली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.