IPL 2024, Gautam Gambhir : ‘तो सगळ्यात चांगला संघमालक आहे,’ असं गौतम गंभीर कुणाबद्दल म्हणाला?

IPL 2024, Gautam Gambhir : आतापर्यंत आपल्याला त्याने एकही प्रश्न विचारला नाही, असं म्हणत गंभीरने शाहरुख खानचं कौतुक केलं आहे

185
India’s New Coach : गौतम गंभीरच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब?
India’s New Coach : गौतम गंभीरच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब?
  • ऋजुता लुकतुके

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा सध्याचा मार्गदर्शक गौतम गंभीरने (IPL 2024, Gautam Gambhir) संघ मालक शाहरुखचं कौतुक करताना, ‘मी पाहिलेला तो सगळ्यात चांगला संघमालक आहे,’ असे उद्गार काढले. ४२ वर्षीय गंभीरने सात वर्षं कोलकाता संघाचं नेतृत्व केलं आहे. आणि या हंगामात तो संघाचा मार्गदर्शक या भूमिकेत संघाबरोबर आहे. या हंगामात कोलकाता संघाच्या भन्नाट कामगिरीचं श्रेय अनेकांनी आणि खुद्द संघातील खेळाडूंनी गौतम गंभीरला दिलं आहे. (IPL 2024, Gautam Gambhir)

पण, खुद्द गंभीरने बहुतांश श्रेय संघमालक शाहरुख खानला (Shah Rukh Khan) दिलं. ‘आम्ही क्रिकेटवर कधी बोलतच नाही,’ असं सांगून तर त्याने सगळ्यांनाच बुचकाळ्यात पाडलं आहे. शाहरुख खानचा खेळांचा चाहता आहे. आणि त्याच्या महाविद्यालयीन दिवसांत हॉकीही खेळलेला आहे. अशावेळी त्याने क्रिकेटविषयी संघाशी न बोलण्याचं धोरण मुद्दाम ठेवलं असेल का? (IPL 2024, Gautam Gambhir)

(हेही वाचा- Ghatkopar Hoarding Accident प्रकरणी चौकशीला मिळणार वेगळं वळण!)

‘मी ज्या संघमालकांबरोबर काम केलंय, त्यात एसआरकेचा क्रमांक खूप वरचा आहे. तो खेळाडू आणि प्रशिक्षक वर्गावर विश्वास दाखवतो. मी कोलकाता संघाबरोबरच काम करतोय, म्हणून हे मी बोलत नाहीए. पण, मी संघाचा कर्णधार असताना शाहरुखने मोजून ७० सेकंदांच्या वर कधी माझ्याशी गप्पा मारल्या नाहीत. मला नेहमी स्वातंत्र्य दिलं, ’ असं गंभीर रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) युट्यूब वाहिनीवर बोलताना सांगितलं. (IPL 2024, Gautam Gambhir)

गंभीरने २०११ मधली शाहरुख (Shah Rukh Khan) बरोबरची एक आठवणही सांगितली. त्याच हंगामात गंभीर पहिल्यांदा कोलकाता फ्रँचाईजबरोबर खेळायला लागला. ‘शाहरुख १३ वर्षांपूर्वीच मला बोलला होता. अभिनय कसा करायचा हे मला सांगितलेलं आवडत नाही. तसंच तुलाही क्रिकेटवर मी सल्ला दिलेला आवडणार नाही, याची मला जाणीव आहे आणि त्यानंतर शाहरुखने कधीही संघ निवड किंवा संघाची रणनीती यावर आपलं मत मला दिलेलं नाही,’ असं गंभीरने पुढे बोलून दाखवलं. (IPL 2024, Gautam Gambhir)

(हेही वाचा- Pune Porsche Car Accident: “माझा मुलगा मला परत द्या…” अनिसच्या आईचा काळीज पिळवटणारा आक्रोश)

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ सनरायझर्स हैद्राबादला हरवून अंतिम फेरीत पोहोचला आहे. (IPL 2024, Gautam Gambhir)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.