IOC Withholds IOA Fund : आंतरराष्ट्रीय परिषदेनं भारताचा निधी रोखला

IOC Withholds IOA Fund : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमधील अंतर्गत भांडणांचा फटका असोसिएशनला बसला आहे

262
IOC Withholds IOA Fund : आंतरराष्ट्रीय परिषदेनं भारताचा निधी रोखला
IOC Withholds IOA Fund : आंतरराष्ट्रीय परिषदेनं भारताचा निधी रोखला
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत कलहांचा फटका आता असोसिएशनला बसला आहे. आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारताला मिळणारा निधी रोखून धरला आहे. पण, त्यामुळे ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्ष पी. टी. उषा (P. T. Usha) आणि खजिनदार सहदेव यादव (Sahdev Yadav) यांच्यातील शाब्दिक युद्ध आणखी भडकलं आहे. ८ ऑक्टोबरला ऑलिम्पिक समितीने आयओएमधील भांडणांची दखल घेतली आहे. त्यानंतर शुक्रवारी तसं पत्र पी टी उषा आणि इतर कार्यकारिणी सदस्यांना लिहिलं आहे. (IOC Withholds IOA Fund)

(हेही वाचा- Ind vs NZ Test Series : न्यूझीलंड विरुद्घच्या कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमरा भारताचा उपकर्णधार)

‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये सुरू असलेले वाद आम्हाला समजले आहेत. काही सदस्य एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. वादाचे हे मुद्दे आंतरराष्ट्रीय समितीपर्यंतही पोहोचले आहेत. त्यामुळे भारताला ऑलिम्पिक विकासासाठी देण्यात येणारा निधी रोखून धरण्यात येत आहे,’ असं ऑलिम्पिक समितीतील एक संचालक जेम्स मॅकलिऑड यांनी म्हटलं आहे. (IOC Withholds IOA Fund)

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमधील परिस्थिती ही अस्थिरता निर्माण करणारी आहे. त्याविषयी अधिक स्पष्टता अपेक्षित असल्याचा शेरा आंतरराष्ट्रीय समितीने मारला आहे. खासकरून पी. टी. उषा (P. T. Usha) आणि खजिनदार सहदेव यादव (Sahdev Yadav) यांच्यातील वाद हा आर्थिक अनियमितते वरून आहे. त्या वादाकडे ऑलिम्पिक समितीने लक्ष वेधलं आहे. ऑलिम्पिक आयोजनाच्या टिव्ही प्रसारणाच्या हक्कातून ऑलिम्पिक समितीला मिळणाऱ्या पैशातील काही वाटा ही समिती सदस्या देशांच्या ऑलिम्पिक असोसिएशनना देत असते. हे पैसे खेळाडू विकास कार्यक्रमासाठी वापरण्यात यावेत असा दंडक आहे. (IOC Withholds IOA Fund)

(हेही वाचा- Mahavikas Aghadi : दसऱ्याच्या मुहुर्तावर जागावाटप जाहीर करण्याचा मविआचा निर्णय हुकला; काय झाल्या अडचणी जाणून घ्या…)

पण, ऑलिम्पिक असोसिएशनमधील भांडणं मिटत नाहीत आणि सीईओची नियुक्ती वेळेत होत नाही, तोपर्यंत हा निधी भारताला मिळणार नाही. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला ऑलिम्पिक आयोजनाचं स्वप्न दाखवलं आहे. २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी अर्ज करण्याची तयारी ऑलिम्पिक असोसिएशनने दाखवली आहे. आणि दुसरीकडे संघटनांमधील वाद संपताना दिसत नाहीत. त्यामुळे ऑलिम्पिक आयोजनाच्या मोहिमेला नक्की धक्का बसणार आहे. (IOC Withholds IOA Fund)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.