International Masters League : सचिन, सुनील गावसकरांच्या हस्ते इंटरनॅशनल मास्टर्स लीग लाँच

International Masters League : सचिन तेंडुलकर स्वत: या लीगमध्ये खेळणार आहे.

91
International Masters League : सचिन, सुनील गावसकरांच्या हस्ते इंटरनॅशनल मास्टर्स लीग लाँच
  • ऋजुता लुकतुके

इंटरनॅशनल मास्टर्स लीगच्या (International Masters League) निमित्ताने सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा चाहत्यांना क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे जुने खेळाडू या लीगमध्ये एकमेकांशी दोन हात करताना दिसतील. यात सहा संघ सहभागी होणार असून टी-२० प्रकारात ही लीग खेळवण्यात येईल. मुंबई, लखनौ आणि रायपूर या तीन ठिकाणी ही स्पर्धा होईल. सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर या लीगचे सहसंस्थापक आहेत. आणि त्यांच्या हस्तेच लीगचं अनावरण करण्यात आलं आहे.

(हेही वाचा – Nitin Gadkari : वाहन चालकांसाठी खुशखबर! इंधनाचा दर होणार स्वस्त ; सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत)

वर्षातून एकदा होणाऱ्या लीगची कल्पना सगळ्यात आधी सचिन तेंडुलकरने मांडली होती. सुनील गावसकरही मग तिच्याशी जोडले गेले. पहिल्या लीगचे ते आयुक्तही आहेत. आयपीएलच्या धर्तीवर सहा संघांची विक्री होणार आहे. आणि सध्या काही संभाव्य संघ मालकांबरोबर त्यासाठी बोलणी सुरू आहेत. (International Masters League)

(हेही वाचा – IPL Retention : आपल्या संघात कायम ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्स रोहित आणि बुमराहवर हार्दिक, सूर्यकुमार इतकेच पैसे मोजेल का?)

‘टी-२० प्रकार आता लोकांमध्ये चांगला रुजला आहे. त्यामुळे नवीन प्रेक्षक या खेळाबरोबर जोडला गेला आहे. आता या चाहत्यांना खेळातील काही जुनी द्वंद्वं नवीन प्रकारात अनुभवायची आहेत. त्यामुळे या लीगचा घाट घातला आहे. आणि चाहत्यांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आम्हाला आशा आहे,’ असं सचिन तेंडुलकरने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू या लीगमध्ये खेळण्यासाठी पात्र असतील. येत्या काही दिवसांतच संघ निश्चित करून खेळाडूंचा लिलावही एका महिन्यात पार पाडण्याचा दोघांचा विचार आहे. दरवर्षी, नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुमारास ही लीग घेतली जाईल. (International Masters League)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.