India’s New Coach : गौतम गंभीरच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब?

India’s New Coach : गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक पदासाठी मुलाखत नुकतीच पार पडली आहे

95
India’s New Coach : गौतम गंभीरच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब?
India’s New Coach : गौतम गंभीरच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब?
  • ऋजुता लुकतुके

गौतम गंभीरच (Gautam Gambhir) भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक (India’s New Coach) होणार हे आता जवळ जवळ नक्की आहे.  ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, विश्वचषक संपता संपता गंभीरच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते. मंगळवारी क्रिकेट विषयक समितीने त्याची मुलाखतही घेतली. भारतीय प्रशिक्षकपदासाठी उमेदवारांची नावं शॉर्टलिस्ट करण्याची जबाबदारी याच समितीवर सोपण्यात आली होती. गौतम गंभीरप्रमाणेच (Gautam Gambhir) माजी क्रिकेटपटू वुर्केरी रमन यांनी देखील मुलाखत दिली आहे, असं वृत्त रेव स्पोर्ट्सनं दिलंय. (India’s New Coach)

गंभीरबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान त्याला बीसीसीआयकडून तीन महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आल्याचं आता समजतंय. हे प्रश्न पुढील प्रमाणे आहेत, (India’s New Coach)

(हेही वाचा- T20 World Cup, SA vs USA : पहिल्या सुपर ८ सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अमेरिकेवर १८ धावांनी विजय )

  • संघाच्या कोचिंग स्टाफबाबत तुझं मत काय?

  • फलंदाजी आणि गोलंदाजीतील संघातील ज्येष्ठ खेळाडूंशी तू कसं जुळवून घेणार?

  • वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळे कप्तान, तंदुरुस्ती आणि आयसीसी चषक जिंकण्यात येणारं अपयश यावर तुझं मत काय? हे?

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मे होती. बीसीसीआयनं आयपीएल २०२४ दरम्यान गंभीरशी अनौपचारिक चर्चा केली होती. गंभीर यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.