Ind vs SA, 4th T20 : वाँडरर्स मैदानावर भारतीय संघाकडून विक्रमांची मोडतोड

Ind vs SA, 4th T20 : फलंदाजी आणि गोलंदाजीतही विक्रमांची आतषबाजी झाली 

122
Ind vs SA, 4th T20 : वाँडरर्स मैदानावर भारतीय संघाकडून विक्रमांची मोडतोड
Ind vs SA, 4th T20 : वाँडरर्स मैदानावर भारतीय संघाकडून विक्रमांची मोडतोड
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने यंदा जून महिन्यात टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर या प्रकारात कमालीचं वर्चस्व गाजवलं आहे. विश्वचषकानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे खंदे शिलेदार टी-२० प्रकारातून निवृत्त झाले. पण, त्यांची जागा संजू सॅमसन, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग यांनी समर्थपणे घेतली आहे. तसंच गोलंदाजीतही अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, यांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे. (Ind vs SA, 4th T20)

आताही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने परदेशी भूमीवर वर्चस्व गाजवताना मालिका तर ३-१ ने जिंकलीच. शिवाय फलंदाजी आणि गोलंदाजीत अनेक नवीन विक्रम रचले. भारतीय संघाने या सामन्यात निर्धारित २० षटकांत १ बाद २८३ अशी धावसंख्या रचली. जोहानसबर्गच्या चौथ्या कसोटीत साजरे झालेले नवीन विक्रम पाहूया, (Ind vs SA, 4th T20)

  • एका डावांत सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत भारतीय संघ आता संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा विक्रम २७ षटकारांसह झिंब्बाब्वेच्या नावावर आहे. त्यांनी गांबिया विरुद्ध २७ षटकार ठोकले होते. पण, भारतीय संघाकडून सर्वाधिक षटकारांचा विक्रम शुक्रवारी साजरा झाला. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातच बांगलादेश विरुद्ध भारतीय संघाने २२ षटकार एका डावात खेचले होते. तो विक्रम मोडीत निघाला. (Ind vs SA, 4th T20)

  • संजू सॅमसन (नाबाद १०९) आणि तिलक वर्मा (नाबाद १२०) यांनी दुसऱ्या गड्यासाठी २१० धावांनी नाबाद भागिदारी रचली. ९३ चेंडूंत त्यांनी या धावा केल्या. टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या गड्यासाठी ही सगळ्यात मोठी भागिदारी आहे. तर एकंदरीत सहावी मोठी भागिदारी आहे.  (Ind vs SA, 4th T20)

  • भारतीय संघाने १४.१ षटकांत २०० चा टप्पा पार केला. टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील ही तिसरी वेगवान धावसंख्या आहे. तर भारतासाठी ही दुसरी सर्वोच्च टी-२० धावसंख्या आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातच भारताने बांगलादेश विरुद्ध ३ बाद २९७ धावा केल्या होत्या. संजू सॅमसनने या कॅलेंडर वर्षातील तिसरं टी-२० शतक ठोकलं आहे. एका वर्षांत ३ शतकं ठोकणारा तो पहिला फलंदाज आहे. (Ind vs SA, 4th T20)

  • तिलक वर्माचं हे सलग दुसरं टी-२० शतक आहे. त्यामुळे तो संजू सॅमसन, गुस्ताव मॅकिऑन, रिली रसॉ आणि फिल सॉल्ट यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. तर एकाच सामन्यात दोन फलंदाजांनी शतकं झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे (आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशांमध्ये). (Ind vs SA, 4th T20)

  • भारताने १ बाद २८३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० प्रकारातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजने ३ बाद २५८ धावा केल्या होत्या. (Ind vs SA, 4th T20)

टी-२० क्रिकेटमध्ये साजरे झालेले विक्रम 
  • एका डावांत २३ षटकार (आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशांमध्ये सर्वोच्च)

  • एकाच सामन्यात दोम फलंदाजांची शतकं (आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशांमध्ये सर्वोच्च)

  • दुसऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागिदारी (नाबाद २१०)

  • दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च टी-२० धावसंख्या (१ बाद २८३)

  • सर्वात जलद २०० धावा (१४.१ षटकांत २०० धावा)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.