Ind vs SA, 3rd T20 : तिलक वर्मा टी-२० मधील सर्वात लहान शतकवीर 

Ind vs SA, 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं शतक तिलकचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक आहे 

117
Ind vs SA, 3rd T20 : तिलक वर्मा टी-२० मधील सर्वात लहान शतकवीर 
Ind vs SA, 3rd T20 : तिलक वर्मा टी-२० मधील सर्वात लहान शतकवीर 
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी-२० सामन्यात तिलक वर्माचं शतक हे वैशिष्ट्य ठरलं. फलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर तिलकने ५६ चेंडूंत नाबाद १०७ धावा केल्या त्या ७ षटकार आणि ८ चौकारांच्या सहाय्याने. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत तिलकने एक बाजू लावून धरली. त्यामुळेच भारताला निर्धारित २० षटकांत ६ बाद २१९ धावा करता आल्या. (Ind vs SA, 3rd T20)

(हेही वाचा- Amit Shah: CISF च्या पहिल्या महिला बटालियनला केंद्राची मान्यता; ‘या’ सुरक्षा सांभाळणार)

त्याचबरोबर तिलक वर्माने एक विक्रमही केला आहे. आयसीसी क्रमवारीतील पहिल्या दहांत असलेल्या संघाविरुद्ध सगळ्यात कमी वयात केलेलं हे शतक ठरलं आहे. पाचच दिवसांपूर्वी तिलकने आपला २२ वा वाढदिवस साजरा केला आहे. २२ दिवस आणि ५ दिवसांच्या तिलकने सेंच्युरियनच्या मैदानावर शतक साजरं केलं. (Ind vs SA, 3rd T20)

सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर संजू सॅमसन त्रिफळाचीत झाला. त्यामुळे तिलक वर्माला बढती देण्यात आली. त्याने डावाला स्थैर्य देण्याबरोबरच फटकेबाजी करून धावाही जमवल्या. ५१ व्या चेंडूवर त्याने शतक पूर्ण केलं. मैदानाच्या चारही बाजूंनी फटके खेळण्याची क्षमता तिलक वर्माकडे आहे. त्याचं यथार्थ दर्शन या सामन्यात घडलं. अचूक टायमिंग आणि क्षेत्ररक्षकांमधील मोकळ्या जागा हेरून त्याने फटकेबाजी केली. (Ind vs SA, 3rd T20)

 भारतीय टी-२० संघांत सध्या प्रत्येक जागेसाठी चुरस आहे. अशावेळी तिलक वर्माने ही खेळी साकारली आहे. त्याचबरोबर आयपीएलचा मेगा लिलावही नोव्हेंबरमध्ये होणार आहे. पण, मुंबई इंडियन्सने त्याची कुवत ओळखून आधीच त्याला आपल्याकडे कायम ठेवलं आहे. (Ind vs SA, 3rd T20)

(हेही वाचा- शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं; Raj Thackeray यांनी मांडला पक्षबदलाचा प्रवास)

भारताकडून सगळ्यात लहान वयात झालेली शतकं पाहूया, 

यशस्वी जयसवाल – २१ वर्ष २७९ दिवस (वि. नेपाळ)

तिलक वर्मा – २२ वर्ष ५ दिवस (वि. द आफ्रिका)

शुभमन गिल – २३ वर्ष १४६ दिवस (वि न्यूझीलंड)

सुरेश रैना – २३ वर्ष १५६ दिवस (वि द आफ्रिका) 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.