Ind vs NZ, 3rd Test : वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल नसणार?

 Ind vs NZ, 3rd Test : खेळपट्टीवर थोडं गवत ठेवण्यात आलं आहे. 

78
Ind vs NZ, 3rd Test : वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल नसणार?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे. आता तिसरी कसोटी येत्या १ तारखेपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. पहिल्या दोन कसोटींप्रमाणेच या कसोटीतील खेळपट्टीवरही आतापासून चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघाला बंगळुरूमध्ये तेज खेळपट्टीवर तर पुण्यात फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारताचा पराभव झाला आहे. त्यामुळे मुंबईत नेमकी कशी खेळपट्टी हवी याचं उत्तर क्युरेटरला शोधावं लागणार आहे. (Ind vs NZ, 3rd Test)

(हेही वाचा – Census in India : देशात लवकरच होणार जनगणना)

सध्या खेळपट्टीवर गवत आहे आणि ते पाहता ही खेळपट्टी पहिल्यापासून फिरकीला साथ देणं थोडं कठीण आहे. किंबहुना पहिल्या दिवशी ही खेळपट्टी फलंदाजीला साथ देईल अशी चिन्ह आहेत. पुण्यात मिचेल सँटनरच्या डावखुऱ्या फिरकीने भारतीय फलंदाजांना चकवलं होतं. त्याने सामन्यात १३५ धावांत १३ बळी घेतले. वानखेडे स्टेडिअमचे क्युरेटर रमेश मामुणकर आहेत आणि अलीकडेच आशिष भौमिक, तपोश चॅटर्जी या बीसीसीआयच्या क्युरेटर पॅनलमधील सदस्यांनी रमेश मामुणकर यांच्याशी चर्चा केली आहे. (Ind vs NZ, 3rd Test)

(हेही वाचा – Godrej Real Estate : गोदरेज प्रॉपर्टीजच्या सीईओंना किती पगार मिळतो?)

‘वानखेडेची खेळपट्टी खेळकर असेल आणि पहिल्या दिवशी ती फलंदाजांना साथ देईल. पण, दुसऱ्या दिवशीपासून ती हळू हळू फिरकीला साथ द्यायला लागेल,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे. वानखेडे मैदानावर शेवटची आंतरराष्ट्रीय कसोटी २०२१ मध्ये झाली होती. तेव्हा भारताने न्यूझीलंडचा ३७३ धावांनी पराभव केला होता. भारताने या कसोटीत न्यूझीलंडला ६२ आणि ११७ धावांत गुंडाळलं होतं. (Ind vs NZ, 3rd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.