Ind vs NZ, 3rd Test : भारताचे ‘हे’ ४ दिग्गज खेळाडू भारतात शेवटची कसोटी खेळले का?

Ind vs NZ, 3rd Test : विराट, रोहित, जडेजा आणि अश्विनचं अपयश न्यूझीलंडविरुद्ध उठून दिसलं.

118
Border - Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलियन मीडियाने असं केलं भारतीय संघाचं कौतुक
Border - Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलियन मीडियाने असं केलं भारतीय संघाचं कौतुक
  • ऋजुता लुकतुके

एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभव जितका जिव्हारी लागला नव्हता इतका न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पराभव भारतीय क्रिकेटप्रेमींना सलतो आहे. मायदेशात सलग १८ मालिकांमध्ये अपराजित असलेला संघ चक्क व्हाईटवॉश पत्करतो, ही सल मोठी आहे. त्यातही प्रमुख फलंदाजांचं अपयश खुपणारं आहे. भारतीय खेळाडू फिरकीला खेळू शकले नाहीत, असं चित्र कदाचित पहिल्यांदाच दिसलं असेल. (Ind vs NZ, 3rd Test)

रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन या खेळाडूंना अपयश आणखी बोचत असेल. कारण, मागच्या १२ वर्षांचा कालावधी या खेळाडूंनी पाहिलाय. २०१२ मध्ये भारताचा मायदेशातील शेवटचा मालिका पराभव झाला होता. तेव्हा हेच खेळाडू एकत्र येऊन संघ बांधत होते. त्यांनी तो बांधला आणि सलग १८ मालिका विजय संघाला मिळवून दिले. आता हे खेळाडू ३५ पार करून गेले आहेत आणि त्यांची या कसोटीतील कामगिरी विसरावी अशीच आहे. (Ind vs NZ, 3rd Test)

(हेही वाचा – ICC Test Championship : कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीसाठी भारताचं आव्हान आता आणखी खडतर)

रोहित आणि विराट ३ कसोटीतील ६ डावांत मिळून धावांची शंभरी गाठू शकले नाहीत. तर जडेजा आणि अश्विन षटकामागे ४ पेक्षा जास्त गतीने धावा लुटत होते. एकेका कसोटींत दोघांना १०-१० बळी मिळाले म्हणून. नाहीतर ती आकडेवारीही फारशी बरी नाहीच आहे. अशावेळी एकच प्रश्न मनात येतो आता चौघंही कसोटीला राम राम करण्याच्या जवळ पोहोचले आहेत का? (Ind vs NZ, 3rd Test)

ऑस्ट्रेलिया बरोबरच्या मालिकेत चौघांचाही भारतीय संघात समावेश आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात कसोटी मालिका खेळेल ती थेट २०२५ मध्ये. ती ही ऑक्टोबरमध्ये. न्यूझीलंडच्या पराभवानंतर बीसीसीआयने भारतीय कामगिरीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावल्याचं समजतंय. यात अर्थातच एक मुद्दा असेल तो या ज्येष्ठ खेळाडूंच्या कामगिरीचा. चौघांना एकत्र नाही तरी टप्प्या टप्प्याने निवृत्त करण्याचा विचार आता होऊ शकतो आणि ही प्रक्रिया फार दूर नाही तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतरच सुरू होऊ शकते. (Ind vs NZ, 3rd Test)

(हेही वाचा – Article 370 : पहिल्याच दिवशी Jammu and Kashmir विधानसभेत प्रचंड गदारोळ; जाणून घ्या कलम ३७० का ठरला चर्चेचा विषय?)

तसं झालं तर वय पाहता अश्विनचा क्रमांक या चौघांमध्ये सगळ्यात वर लागेल. कामगिरी पाहता त्या खालोखाल रविंद्र जडेजाचा नंबर लागू शकेल. ऑस्ट्रेलियानंतर यातील किमान दोन खेळाडू निवृत्त होऊ शकतील. रोहितकडे सध्या कप्तानीची जबाबदारी असली तरी त्याचं वय ३६ वर्षांचं आहे. त्यामुळे तो ही ऑक्टोबर २०२५ पर्यंत खेळतच राहील असं सांगता येत नाही. विराट तंदुरुस्त आहे. या चौघांमध्ये सातत्यपूर्ण आहे. पण, कसोटींत मागच्या ५ वर्षांत त्याची कामगिरी चांगली झालेली नाही. त्यामुळे भारतातील या चौघांची ही खरंच शेवटची कसोटी असू शकेल. निदान चौघं एकत्र भारतासाठी खेळलेत अशी तरी ही शेवटचीच कसोटी असेल. (Ind vs NZ, 3rd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.