Ind vs NZ, 1st Test : भारतीय संघ पहिल्या डावांत ४६ धावांत गारद

 Ind vs NZ, 1st Test : कोहलीसह एकूण ५ फलंदाजांनी भोपळाही फोडला नाही.

136
Ind vs NZ, 1st Test : भारतीय संघ पहिल्या डावांत ४६ धावांत गारद
  • ऋजुता लुकतुके

बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस पावसात वाहून गेला होता. आता दुसऱ्या दिवशी पावसामुळे ओल्या झालेल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची मात्र दाणादाण उडाली. नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतलेला संघ दीड सत्रांमध्ये ४६ धावांमध्ये गुंडाळला गेला. रिषभ पंत (२०) आणि यशस्वी जयसवाल (१३) या दोघांनीच फक्त दुहेरी धावसंख्या ओलांडली. बाकी सगळे एकेरी धावेतच बाद झाले. आणि विराट कोहलीसह ५ फलंदाजांना अगदी भोपळाही भोडता आला नाही. पंत आणि जयसवाल यांच्यातील २१ धावांची भागिदारी ही डावातील सर्वोच्च भागिदारी ठरली. अख्ख्या डावांत फक्त ४ चौकार लगावले गेले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने १५ धावांत ५ तर विल्यम ओरुकने २३ धावांत ४ बळी मिळवले. (Ind vs NZ, 1st Test)

(हेही वाचा – Jammu and Kashmir ला राज्याचा दर्जा मिळणार ? काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?)

भारतीय खेळपट्ट्यांवरील भारताची ही सगळ्यात छोटी धावसंख्या आहे. तर एकूण क्रिकेटच्या इतिहासातील तिसरी लहान भारतीय धावसंख्या ठरली आहे. शिवाय एकाच डावात ५ फलंदाज शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढवली ती वेगळीच. २०२० मध्ये ॲडलेड इथं भारतीय संघ ३६ धावांत सर्वबाद झाला होता. ती भारताची सगळ्यात लहान धावसंख्या आहे. बंगळुरूमध्ये दुसऱ्या दिवशी पाऊस नसला तरी वातावरण ढगाळ होतं आणि सूर्याचं दर्शन दूरूनही नव्हतं. अशावेळी संघात तीन फिरकी गोलंदाज खेळवायचे आणि पहिली फलंदाजी करायची ही रोहितची रणनीती सगळ्यांनाच चक्रावून टाकणारी होती. त्याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला आहे. (Ind vs NZ, 1st Test)

(हेही वाचा – बविआमध्ये पडली फूट; Hitendra Thakur मविआला देणार पाठिंबा)

अगदी दुसऱ्याच षटकात रोहित शर्मा टीम साऊदीच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता त्रिफळाचीत झाला. आणखी दोन षटकांतच विराटला अनियमित उसळीच्या एका चेंडूने चकवलं. लेग स्लिपमध्ये फिलिप्सने त्याचा झेल घेतला. त्याच षटकात सर्फराझ शून्यावरच बाद झाला. म्हणता म्हणता भारताची अवस्था ७ बाद ३७ झालेली होती. ३ बाद १३ धावसंख्या असताना पुन्हा पाऊस पडला आणि खेळपट्टी आणखी ओली झाली. ३० चेंडूंमध्ये भारताचे ५ गडी बाद झाले. भारतीय संघाला आता न्यूझीलंड संघाला लवकरात लवकर बाद करून आघाडी कमी करण्याची काळजी घ्यावी लागेल. (Ind vs NZ, 1st Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.