-
ऋजुता लुकतुके
हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांची अर्धशतकं आणि बिश्नोई, हर्षित राणा यांची दमदार गोलंदाजी यांच्या जोरावर भारताने पुण्यातील टी-२० सामन्यात इंग्लंडवर १५ धावांनी मात केली. आणि त्याचबरोबर ही मालिकाही आता खिशात टाकली आहे. इंग्लंडच्या खराब फलंदाजीनेही भारताच्या विजयात हातभार लावला. कारण, चांगल्या सुरुवातीचा फायदा करून घेण्यात इंग्लिश संघ दोन्ही डावांत अपयशी ठरला. (Ind vs Eng, 4th T20)
नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिल्यावर खरंतर सुरुवातीला ३ बाद १२ आणि मग ५ बाद ७९ अशी झाली होती. संजू सॅमसन (१), अभिषेक शर्मा (२९), सूर्यकुमार यादव (०), तिलक वर्मा (०) आणि रिंकू सिंग ३० धावा करूनच बाद झाले होते. पण, अशावेळी हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी भारताचा डाव सावरला आणि उभारलाही दोघांनी अर्धशतकं ठोकत ८७ धावांची भागिदारीही केली. हार्दिकने ४ तर शिवमने १ षटकार ठोकत धावगती कमी होणार नाही याचीही काळजी घेतली. त्यामुळे भारताने निर्धारित २० षटकांत ९ बाद १८१ अशी समाधानकारक धावसंख्या रचली. शिवम दुबेनं ५३ आणि हार्दिकनेही ५३ धावा केल्या. इंग्लंडकडून साकीब मेहमूदने ३ बळी मिळवले. (Ind vs Eng, 4th T20)
For his vital half-century, Shivam Dube bagged the Player of the Match Award in the fourth #INDvENG T20I. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/pUkyQwxOA3#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/rMbxYog0mO
— BCCI (@BCCI) January 31, 2025
शिवमला फलंदाजी करताना जोफ्रा आर्चरचा एक चेंडू डोक्यावर बसला. त्यामुळे पंचांनी तातडीने फिजिओ मैदानात बोलावले. टी-२० च्या नियमाप्रमाणे खेळाडूच्या डोक्यावर चेंडू बसल्यास खबरदारी म्हणून खेळाडूला तंबूत बसवता येतं. आणि त्याच्याजागी कन्कशन बदली खेळाडू खेळवता येतो. भारताने हर्षित राणाला दुसऱ्या डावात खेळवलं. आणि याच राणाने ३३ धावांत ३ बळी घेत भारताच्या विजयात मोलाची जबाबदारी उचलली. त्यापूर्वी इंग्लंडच्या बेन डकेट आणि फील सॉल्ट यांनी ६२ धावांची सलामी दिलेली होती. पण, आधी म्हटल्याप्रमाणे दोन्ही डावांत इंग्लंडने मिळालेली संधी दवडली. बिनबाद ६२ वरून काही मिनिटांतच त्यांचा डाव ३ बाद ६७ आणि मग ७ बाद १३३ वर अडखळत होता. (Ind vs Eng, 4th T20)
(हेही वाचा- गॅस सिलेंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात कपात; किती झाली LPG ची किंमत ?)
रवी बिश्नोई (२८ घावांत ३) आणि वरुण चक्रवर्ती (२८ धावांत २) यांनी ही किमया केली. हॅरी ब्रूकने २६ चेंडूंत ५१ धावा करत इंग्लंडसाठी आशा निर्माण केली होती. पण, वरुणने त्याचीह काटा काढल्यावर इंग्लिश संघ सावरू शकला नाही. चुकीचे फटके खेळत फलंदाज बाद होत गेले. अखेर १६६ धावांत इंग्लिश संघ सर्वबाद झाला. पदार्पणात हर्षित राणाने ३३ धावांत ३ बळी मिळवले. (Ind vs Eng, 4th T20)
मालिकेत आता भारतीय संघ ३-१ ने आघाडीवऱ आहे. तर शेवटचा टी-२० सामना २ फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे. (Ind vs Eng, 4th T20)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community