Ind vs Ban : बांगलादेश विरुद्ध खेळताना विराट कोहलीला आहे ‘या’ गोलंदाजाची चिंता 

एरवी भारतीय संघच या सामन्यासाठी फेव्हरिट आहे. कारण, फलंदाजांची बेडर वृत्ती आणि तशीच फलंदाजी. पण, बांगलादेश विरुद्ध स्टार फलंदाज विराट कोहलीला एक चिंता नक्की सतावतेय.

23
Ind vs Ban : बांगलादेश विरुद्ध खेळताना विराट कोहलीला आहे ‘या’ गोलंदाजाची चिंता 
Ind vs Ban : बांगलादेश विरुद्ध खेळताना विराट कोहलीला आहे ‘या’ गोलंदाजाची चिंता 

ऋजुता लुकतुके

शुक्रवारी भारत आणि बांगलादेशचे (Ind vs Ban) संघ विश्वचषकात आमने सामने येतील तेव्हा सगळ्यांचं लक्ष भारतीय फलंदाजांकडे असेल. धावांसाठी पायघडी असलेल्या गहुंजे मैदानावर भारतीय फलंदाजा नेमका काय चमत्कार करून दाखवतात याची उत्सुकता सगळ्यांना आहे. संघातील स्टार फलंदाज रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर सगळ्यांची नजर असेल.

त्याचवेळी विराट कोहली एका बांगलादेशी गोलंदाजाचा विचार करत असेल. असा गोलंदाज ज्याने तब्बल ५ वेळा त्याचा बळी मिळवलाय. त्या गोलंदाजाचं नाव आहे बांगलादेशचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन. खरंतर शकीब या सामन्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. पण, त्याने या महत्त्वाच्या सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा-OnePlus Open : वन प्लस कंपनीचा फोल्डेबल मोबाईल लाँच )

त्यामुळे विराटची डोकेदुखी थोडीफार वाढलीय. शकीबने विराटला पाच वेळा बाद केलं आहे. आणि ते ही आयपीएलमध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये. अर्थात, या सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना शकीब या विक्रमाबद्दल सावधच होता. ‘मला पाचवेळा विराटला बाद करता आलं हे माझं नशीबच आहे. नाहीतर इतका मोठा फलंदाज असेला विराट सहजी बाद होत नाही. अर्थात, प्रत्येक वेळी त्याला बाद करताना मला मोठा आनंद झाला आहे. आणि आताही माझा त्याला जाळ्यात पकडण्याचाच प्रयत्न असेल,’ असं शकीब सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना म्हणाला. (Ind vs Ban)

दुसरीकडे विराट कोहलीनेही शरीब बद्दल गौरवोद्गार काढले आहेत. ‘शकीबबरोबर मी अनेकदा खेळलो आहे. त्याचे वेगवान चेंडू फलंदाजांची भंबेरी उडवतात. खास करून सुरुवातीच्या षटकांमध्ये आणि चेंडू नवीन असताना त्याला खेळणं कठीण आहे. शकीब असा गोलंदाज आहे ज्याला जपून खेळावं लागतं. त्याला आदर दाखवावा लागतो,’ असं विराट म्हणाला. थोडक्यात आज शकीब विरुद्ध विराट असं एक द्वंद्व सामन्या दरम्यान प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.