Ind vs Aus, Perth Test : पर्थ कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी दणदणीत मात

Ind vs Aus, Perth Test : बोर्डर-गावस्कर मालिकेत भारताची १-० ने आघाडी. 

87
Ind vs Aus, Perth Test : पर्थमध्ये साकारला भारताचा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा विजय, कसोटीतील अनेक विक्रमांची मोडतोड
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने यंदाच्या बोर्डर-गावस्कर चषक मालिकेची सुरुवात दणदणीत विजयाने केली आहे. ज्या कसोटीची सुरुवात भारतासाठी १५० धावांत सर्व बाद होण्याने झाली तिथेच भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाला कसोटी जिंकण्यासाठी चौथ्या डावात ५३४ धावा करण्याचं आव्हान होतं. पण. त्यांचा संघ २३८ धावांत गडगडला आणि भारतीय संघाने अशक्य वाटणारा हा विजय साध्य केला. (Ind vs Aus, Perth Test)

रविवारी संध्याकाळी ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद १२ होती तेव्हाच जवळ जवळ भारताचा विजय निश्चित झाला होता. आता चौथ्या दिवशी भारताने त्याच दिशेनं वाटचाल सुरूच ठेवली. सोमवारच्या दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजा ४ धावांवर बाद झाला. धोकादायक वाटणारा स्टिव्ह स्मिथही १७ धावा करून बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद ७९ झाली होती. निम्मा संघ शंभरीच्या आत परतल्यावर भारताचा विजय स्पष्टच होता. पण, मध्ये ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी ९९ धावांची भागिदारी करून पराभव थोडा लांबवला. हेडने ८९, मार्शने ४७ आणि मागून आलेल्या ॲलेक्स केरीने ३६ धावा केल्या. युवा वॉशिंग्टन सुंदर आणि नितिश रेड्डी यांनी उरलेले बळी मिळवले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव २३८ धावांत संपून भारताचा विजय साध्य झाला. न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर बॅकफूटवर गेलेल्या भारतीय संघाला या विजयानंतर उभारी आली आहे. शिवाय मालिकतेही भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. (Ind vs Aus, Perth Test)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election Result 2024: महायुतीच्या ‘या’ १५ उमेदवारांचे मताधिक्य लाखाच्यावर!)

या कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व करणारा बदली कर्णधार जसप्रीत बुमराहने पहिल्या डावांत ५ आणि दुसऱ्या डावांत ३ बळी मिळवत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. पहिल्या डावांत १५० धावांत गुंडाळले गेल्यावर ऑस्ट्रेलियाला १०४ धावांत बाद केल्यामुळेच भारतीय संघ कसोटीत पुनरागमन करू शकला. शिवाय चौथ्या डावांत ऑस्ट्रेलियाचे दोन बळी झटपट मिळवण्यातही बुमराहचा वाटा होता. त्यामुळे बुमराहलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. (Ind vs Aus, Perth Test)

(हेही वाचा – बुलडोझर फिरवला, तर मग आम्हाला दोष देऊ नका; Nitesh Rane यांचा व्हिडिओ व्हायरल)

त्याचबरोबर दुसऱ्या डावांत जयस्वालच्या १६१ आणि विराट कोहलीच्या नाबाद १०० धावांमुळे भारतीय संघ पर्थमध्ये ६ बाद ४८७ अशी विराट धावसंख्या रचू शकला. शिवाय जयस्वाल आणि के. एल. राहुल यांनी २०१ धावांनी सलामीही दिली. आता भारतीय संघाने मालिकेत १-० ने महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. दुसरी ॲडलेड कसोटी ४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही दिवस-रात्र चालणारी कसोटी आहे. (Ind vs Aus, Perth Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.