Ind vs Aus, Perth Test : पर्थ कसोटीत पहिल्या दिवशी २१७ धावांवर १७ बळी, अनेक विक्रमांची मोडतोड

Ind vs Aus, Perth Test : पर्थ कसोटीवर आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व आहे.

117
Perth Test, 2nd Day : पर्थ कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बुमराह, जयस्वाल आणि राहुलचा जलवा
  • ऋजुता लुकतुके

पर्थ कसोटीत भारतीय संघाला १५० धावांत सर्वबाद केल्यावर ऑस्ट्रेलियन संघासाठी काम सोपं झालं असं वाटत होतं. पण, त्यांची फलंदाजांची फळीही अनपेक्षितपणे गडगडली. कसोटीच्या पहिल्या दिवशी तब्बल १७ फलंदाज बाद झाले. पहिल्या सत्रात जोस हेझलवूड आणि तिसऱ्या सत्रात जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने ही वेळ आणली. खरंतर बहुचर्चित बोर्डर-गावस्कर चषकाच्या पहिल्या दिवशी विक्रमी ३२,००० प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पण, त्यांना विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, स्टिव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड अशा सगळ्यांनी नाराज केलं आणि उलट गोलंदाजांची चलती दिसून आली. अनेक नकोसे विक्रम फलंदाजांच्या नावावर लागले. त्यासगळ्या विक्रमांचा आढावा घेऊया, (Ind vs Aus, Perth Test)

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy 2024 : रवी शास्त्रींच्या मते ‘हे’ दोन खेळाडू गाजवणार भारताकडून ही मालिका)

  • भारतीय संघ पहिल्या डावांत १५० धावांत गडगडला. २१ व्या शतकात भारतीय संघाची ऑस्ट्रेलियात पहिल्या डावातील ही नीच्चांकी धावसंख्या आहे. यापूर्वी २००० मध्ये सिडनी इथं भारतीय संघ १५० धावांत सर्वबाद झाला होता. तर पहिल्या डावांत दोनशे पेक्षा कमी धावा करण्याची भारतीय संघाची ही गेल्या २४ वर्षांतील सहावी खेप आहे.
  • भारताच्या कसोटी इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वबाद होण्याची भारतीय संघाची ही नववी खेप होती. यातही २०११ च्या किंग्सटन कसोटीनंतर पहिल्यांदा भारतीय संघावर ही वेळ आली. तर सर्वबाद होताना भारतीय संघ पर्थमध्ये फक्त ४९.४ षटकं खेळला. ही एक विक्रम आहे. म्हणजे कसोटीच्या एका डावात परदेशात सर्वात कमी षटकं खेळण्याचा नीच्चांक भारताने या कसोटीत गाठला आहे. (Ind vs Aus, Perth Test)
  • भारतीय संघाकडून नितिश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांनी कसोटी पदार्पण केलं. दोघांनीही अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी बजावली. त्यातही नितिश कुमार आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि पदार्पणात त्याने ४१ धावा केल्या. भारतीय डावातील ही सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या होती. शिवाय आठव्या क्रमांकाला फलंदाजी करताना पदार्पणात भारतासाठी केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे.
  • जसप्रीत बुमराने या कसोटीत स्टिव्ह स्मिथला पहिल्याच चेंडूवर बाद केलं. याला गोल्डन डक म्हणतात. अव्वल फलंदाज स्टिव्ह स्मिथ फक्त दुसऱ्यांदा गोल्डन डकवर बाद झाला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये पोर्ट एलिझाबेध कसोटीत डेल स्टेनने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं. त्यानंतर फक्त बुमराहने हे साध्य केलं आहे.

(हेही वाचा – UBT: विधानसभा निकालापूर्वी भाजपाचा ‘हा’ नेता उबाठा गटात सामील)

  • जसप्रीत बुमराहने आता कसोटी कारकीर्दीत २० धावांच्या सरासरीने १७७ बळी घेतले आहेत. १०० पेक्षा जास्त बळी आणि इतकी कमी सरासरी असलेला बुमराह जगातील फक्त दुसरा गोलंदाज आहे. सिडनी बार्नेस या एकमेव क्रिकेटपटूने यापूर्वी १६ च्या सरासरीने १०० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.
  • विराट कोहली सध्या फलंदाजीत फॉर्ममध्ये नाहीच आहे. त्यातच क्षेत्ररक्षण करताना दुसऱ्या स्लिपमध्ये त्याच्या हातून एक झेल सुटला. त्यामुळे क्षेत्ररक्षणात विराटने एक नकोसा विक्रम नावावर केला आहे. २०११ नंतर विराटने एकूण २९.६ टक्के झेल सोडले आहेत आणि या बाबतीत तो दुसरा आहे. इंग्लंडचा जेम्स अँडरसन ३१.७ टक्क्यांसह अव्वल आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ॲलिस्टर कूक आहे ज्याने २७.९ टक्के वेळा झेल सोडले आहेत. झेलांच्या किमान १०० संधी असलेले खेळाडूच यात धरले आहेत. (Ind vs Aus, Perth Test)
  • १९८० नंतर फक्त दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन संघाने मायदेशात खेळताना पहिले चार गडी ४० धावांच्या आत गमावले. २०१६ मध्ये होबार्ट कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांनी निम्मा संघ १७ धावांत गमावला होता.
  • ऑस्ट्रेलियाचा मार्नस लबुशेन पहिल्या डावांत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ५२ चेंडू खेळला. पण, यात तो फक्त २ धावा करून बाद झाला. ५० चेंडू खेळल्यावर एखाद्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केलेल्या या सर्वात कमी धावा आहेत. यापूर्वी लबुशेननेच २०२३ च्या ओव्हल कसोटीत ५० चेंडूंत ५ धावा केल्या होत्या.
  • १९५२ नंतर ऑस्ट्रेलियातील कसोटींत एका दिवसांत १७ गडी गारद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी ३१,३०२ प्रेक्षकांनी ओप्टस मैदानावर सामन्यासाठी गर्दी केली होती. ऑस्ट्रेलियात कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक प्रेक्षकांचा हा नवीन विक्रम आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.