Ind vs Aus, Border-Gavaskar Trophy : रोहित, विराटची नाही तर ‘या’ फलंदाजाची ऑस्ट्रेलियाला भीती

नोव्हेंबर महिन्यात भारताचा बहुचर्चित ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे.

149
Ind vs Aus, Border-Gavaskar Trophy : रोहित, विराटची नाही तर ‘या’ फलंदाजाची ऑस्ट्रेलियाला भीती
Ind vs Aus, Border-Gavaskar Trophy : रोहित, विराटची नाही तर ‘या’ फलंदाजाची ऑस्ट्रेलियाला भीती
  • ऋजुता लुकतुके

नोव्हेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. आणि या दौऱ्यात संघ पाच कसोटींची मालिका खेळणार आहे. या आधीच्या दौऱ्यात भारताने कसोटी मालिका जिंकली होती. तेव्हापासून बोर्डर – गावसकर करंडकही (Border-Gavaskar Trophy) भारताकडेच आहे. अशावेळी ऑस्ट्रेलियन संघाने या मालिकेकी तयारी सुरू केलेली दिसतेय. आणि यंदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची नाही तर डावखुरा सलामीवीर यशस्वी जयसवालची भीती वाटतेय. (Ind vs Aus)

ऑस्ट्रेलियन मुख्य फिरकीपटू नॅथन लियॉनने यशस्वीला खेळण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी इंग्लिश फिरकीपटू टॉम हार्टलीची मदतही घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या पाच कसोटींच्या मालिकेत यशस्वीने ७१२ धावा केल्या होत्या. अर्थात, ऑस्ट्रेलियातील तेज खेळपट्टा आणि चेंडूला मिळणारी उसळी हे आव्हान मुंबईकर फलंदाजासमोर असेल. (Ind vs Aus)

(हेही वाचा – Vikroli Assembly Election 2024 : राऊत यांना रस्त्यावर फिरण्याची वेळ)

‘मी एकदाही त्याला गोलंदाजी केलेली नाही. पण, टॉम हार्टलीने मला त्याच्या फलंदाजीविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यावरून मी माझा अभ्यास सुरू केला आहे,’ असं लियॉनने क्रिकइन्फो वेबसाईटला सांगितलं आहे. लियॉन इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये लँकेशायरकडून खेळला आहे. आणि तिथे टॉम हार्टलेबरोबर खेळताना त्याने यशस्वीच्या शैलीबद्दलही चर्चा केली आहे. हार्टली हा इंग्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. त्यामुळे डावखुऱ्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करायची याची रणनीती दोघांची सारखीच असेल. (Ind vs Aus)

यंदा बोर्डर – गावसकर करंडक (Border-Gavaskar Trophy) जिंकण्याची चांगली संधी ऑस्ट्रेलियाला असेल असं लियॉनला वाटतं. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने शेवटचा हा करंडक जिंकला होता. त्यानंतर २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये विराट कोहली, २०२१ मध्ये अजिंक्य रहाणे आणि २०२३ मध्ये रोहित शर्माने कर्णधार म्हणून भारताला हा चषक जिंकून दिला आहे. ऑस्ट्रेलियाला यंदा बोर्डर – गावसकर चषक (Border-Gavaskar Trophy) जिंकायचा असेल तर नॅथन लियॉनवर मोठी जबाबदारी असणार आहे. (Ind vs Aus)

आतापर्यंत १२९ कसोटींत त्याने ५३० बळी मिळवले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.