ICC Test Ranking : जसप्रीत बुमराह आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल

ICC Test Ranking : बुमराह बरोबरच यशस्वी जयसवालनेही क्रमवारीत आगेकूच केली आहे 

66
ICC Test Ranking : जसप्रीत बुमराह आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल
ICC Test Ranking : जसप्रीत बुमराह आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलिया विरुद्धची पर्थ कसोटी जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने गाजवली. ७२ धावांत त्याने ८ बळी मिळवले. त्याचा सामन्यातील प्रभाव असा होता की, कसोटीत दोन्ही डावांत त्याने ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी कापून काढली. त्यामुळेच पहिल्या डावांत १०४ आणि दुसऱ्या डावात २३८ धावांमध्ये ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करणं भारताला शक्य झालं. या कामगिरीच्या जोरावर जसप्रीत बुमराह आता आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. (ICC Test Ranking)

(हेही वाचा- Mumbai Crime : चोरीच्या गुन्ह्यांचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या मोलकरणीला अटक)

बुमराहकडे आता ८८३ रेटिंग गुण आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जोस हेझलवूडकडे ८६० आणि तिसऱ्या क्रमांकावर आफ्रिकन कासिगो रबाडा आहे. मोहम्मद सिराजही सामन्यात ५ बळी घेऊन २५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. (ICC Test Ranking)

 यशस्वी जयसवालही १६१ धावांसह फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीही शतकानंतर १३ व्या स्थानावर विराजमान झाला आहे. विराटचं हे कसोटीतील ३० वं शतक आहे. रिषभ पंतही ७३६ गुणांसह सहाव्या क्रमांकावर गेला आहे. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन पर्थ कसोटी खेळले नाहीत. पण, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दोघंही पहिल्या दोन क्रमांकांवर आहेत. (ICC Test Ranking)

(हेही वाचा- Rupali Chakankar: “सुंभ जळाला तरी…”, रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला)

भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया विरुद्धची दुसरी कसोटी ४ डिसेंबरपासून ॲडलेडला सुरू होणार आहे. (ICC Test Ranking)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.