ICC Test Ranking : आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही भारतीय क्रिकेटपटूंची चलती, विराटची आगेकूच

90
ICC Test Ranking : आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही भारतीय क्रिकेटपटूंची चलती, विराटची आगेकूच
ICC Test Ranking : आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही भारतीय क्रिकेटपटूंची चलती, विराटची आगेकूच
  • ऋजुता लुकतुके

आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंचच वर्चस्व आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आणि इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज या मालिकांमुळे या क्रमवारीवर चांगलाच परिणाम झाला आहे. पण, यात इंग्लिश फलंदाजांनी आगेकूच तर पाक फलंदाजांची पिछेहाट झाली आहे. तर भारताचा विराट कोहली (Virat Kohli) दोन पायऱ्या वर चढून आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यशस्वी जायसवालही (Yashasvi Jaiswal) सातव्या क्रमांकावर कायम आहे. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) पाचव्या वरून सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत आऱ अश्विन (R Ashwin), अक्षर पटेल (Akshar Patel) तर गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) आपलं स्थान टिकवून आहेत. (ICC Test Ranking)

 फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा जो रुट अव्वल स्थानावर कायम आहे. तर वेस्ट इंडिजविरुद्ध चमक दाखवणारा हॅरी ब्रूक चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची पिछेहाट झाली आहे. गोलंदाजांमध्ये भारताचा रवीचंद्रन अश्विन अव्वल स्थान टिकवून आहे. तर जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) तिसऱ्या आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सातव्या क्रमांकावर आहेत. तर अष्टपैलूंच्या क्रमवारीतही अश्विन अव्वल स्थानावर आहे. त्याच्या मागोमाग रवीद्र जडेजा आहे. तर अक्षर पटेल (Akshar Patel) सहाव्या स्थानावर आहे. (ICC Test Ranking)

(हेही वाचा- Paris Paralympics 2024 : भारतीय पॅरालिम्पिक खेळाडूंचं पहिल्या दिवसाचं वेळापत्रक )

सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध दोन कसोटींची मालिका खेळणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होईल. कसोटी क्रमवारीत संघ म्हणून भारतीय संघ आजही अव्वल आहे. (ICC Test Ranking)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.