ICC Test Ranking : आयसीसी क्रमवारीत भारतीयांचाच दबदबा, रोहित दुसऱ्या स्थानावर, विराट कुठे?

ICC Test Ranking : जो रुटने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान राखलं आहे.

89
ICC Test Ranking : आयसीसी क्रमवारीत भारतीयांचाच दबदबा, रोहित दुसऱ्या स्थानावर, विराट कुठे?
  • ऋजुता लुकतुके

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) अर्थात, आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचाच बोलबाला दिसून येत आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्यानंतर क्रमवारीत फारसे बदल झाले नसले तरी रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांनी आपले अव्वल क्रमांक याच कालावधीत कसोटी न खेळता राखले आहेत. भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. तर कसोटीमध्ये अष्टपैलूंच्या यादीत रवींद्र जडेजा प्रथम क्रमांकावर आणि रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. (ICC Test Ranking)

(हेही वाचा – Shiv Sena UBT ची मुख्यमंत्री पदावरून चिडचीड उघड)

नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केलेल्या वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने दोन स्थानांनी प्रगती करत पाचवे स्थान पटकावले. तर भारताचा अक्षर पटेलची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. रवींद्र जडेजा ४४४ गुणांसह, तर रविचंद्रन अश्विन ३२२ गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहे. फलंदाजी क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. इंग्लंडचा जो रुट अव्वल स्थानी आहे. अव्वल दहामध्ये तीन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्मा सहाव्या स्थानी असून, यशस्वी जैस्वाल आठव्या, तर विराट कोहली दहाव्या स्थानी आहे. सलामीवीर शुभमन गिलने एका स्थानाने प्रगती करत १८वे स्थान पटकावले. (ICC Test Ranking)

(हेही वाचा – महाराष्ट्र बंदला Gunaratna Sadavarte यांचं उच्च न्यायालयात आव्हान)

भारताच्या दिग्गज खेळाडूंनी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत आपले स्थान कायम राखले आहे. टॉप पाचांत तीन फलंदाज भारताचे आहेत. आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटमध्येही नवी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात पाकिस्तानचा बाबर आझम अजूनही पहिल्या क्रमांक स्थानवर आहे. बाबरने गेल्या आठ महिन्यांपासून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही, तरीही तो पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मात्र यानंतर भारतीय खेळाडूंनी सलग तीन स्थानांवर कब्जा केला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ७६५ गुणांसह आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. बाबर आझमला मागे टाकण्यासाठी रोहीतला आगामी काळात सातत्यपूर्ण खेळ करावा लागेल. यानंतर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. माजी कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर कायम आहे. (ICC Test Ranking)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.