Heath Streak : झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकने घेतला जगाचा निरोप, क्रिडाविश्वावर शोककळा

पत्नीची भावनिक पोस्ट व्हायरल

33
Heath Streak : झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकने घेतला जगाचा निरोप, क्रिडाविश्वावर शोककळा

झिम्बाब्वे संघाचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक (Heath Streak) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ही अफवा नसून हीथच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या कुटुंबियांनी दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी स्ट्रीकच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यानंतर जगभरातील खेळाडूंनी देखील हीथ स्ट्रीक यांना श्रद्धांजली वाहिली होती. पण काही वेळातच त्यांचा सहकारी आणि झिम्बाब्वेचा खेळाडू हेन्री ओलांगा यांनी हीथ स्ट्रीकच्या निधनाचं वृत्त फेटाळून लावलं होतं. पण आता मात्र खरंच अष्टपैलू हीथ स्ट्रीक यांनी वयाच्या 49व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

हीथ स्ट्रीकची (Heath Streak) पत्नी नादिनने पतीच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आणि म्हणाली की, आज पहाटे रविवार 3 सप्टेंबर 2023, माझ्या आयुष्यातील प्रेम आणि माझ्या सुंदर मुलांचे वडील आम्हा सर्वांना सोडून गेले.

(हेही वाचा – IND vs PAK Hockey 5s Match : आशिया कपमध्ये पाकिस्तानला नमवत भारत विजयी; पंतप्रधान मोदींनी केले संघाचे अभिनंदन)

हीथ (Heath Streak) यांनी नोव्हेंबर 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या नावावर कसोटीत 1990 आणि एकदिवसीय सामन्यात 2943 धावा आहेत. याशिवाय हीथने कसोटीत 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स घेतल्या आहेत.

2000 मध्ये, झिम्बाब्वे (Heath Streak) क्रिकेट बोर्डानं हीथ स्ट्रीक यांची कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही संघांचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. स्ट्रीकच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेनं 21 पैकी 4 कसोटी सामने जिंकले तर 11 सामन्यात पराभव झाला, तर 6 सामने अनिर्णित राहिले. एकदिवसीय सामन्यांमध्ये, स्ट्रीकनं 68 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केलं आणि त्यापैकी 47 सामन्यांमध्ये झिम्बाब्वेला पराभवाचा सामना करावा लागला. तर संघानं 18 सामने जिंकले आहेत. स्ट्रीकच्या मृत्यूनंतर, अनेक आजी-माजी खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अनेकांनी ट्वीट करत त्यांना (Heath Streak) श्रद्धांजलीही वाहिली आहे. टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननंही ट्वीट कर स्ट्रीकला श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.