Harmanpreet Kaur : महिला टी-२० विश्वचषकातील अपयशाचा फटका हरमनप्रीतला बसणार? नेतृत्व बदलाची जोरदार चर्चा

Harmanpreet Kaur : टी-२० विश्वचषकात भारतीय संघ बाद फेरीतही प्रवेश करू शकला नाही 

107
Harmanpreet Kaur : महिला टी-२० विश्वचषकातील अपयशाचा फटका हरमनप्रीतला बसणार? नेतृत्व बदलाची जोरदार चर्चा
Harmanpreet Kaur : महिला टी-२० विश्वचषकातील अपयशाचा फटका हरमनप्रीतला बसणार? नेतृत्व बदलाची जोरदार चर्चा
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय महिला संघ टी-२० विश्वचषकात बाद फेरीतही पोहोचू शकला नाही. भारतीय कामगिरीचा फटका कर्णधार हरमनप्रीत कौरला बसू शकतो. आधी न्यूझीलंड आणि मग ऑस्ट्रेलिया विरुद्धचे सामने गमावल्यामुळे भारतीय संघाला साखळीतच स्पर्धेबाहेर व्हावं लागलं. यासाठी कर्णधार म्हणून हरमनप्रीतला जबाबदार धरलं जाऊ शकतं. इंडियन एक्सप्रेसमधील एका अहवालानुसार, बीसीसीआय (BCCI) यावर गंभीरपणे विचारही करत आहे. भारतीय संघ मायदेशी परतल्यावर मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीचे सदस्य यांच्याशी चर्चा करून मग यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं या बातमीत म्हटलं आहे. (Harmanpreet Kaur)

(हेही वाचा- Rajshree Munde : धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीला अपघात; कार अन् ट्रॅव्हल्समध्ये जोरदार धडक)

‘भारतीय संघाला ज्या गोष्टींची गरज होती, त्या सगळ्या स्पर्धेपूर्वी त्यांना देण्यात आल्या. आता बीसीसीआयचं असं मत आहे की, नेतृत्वासाठी नवीन चेहरा आणायची गरज आहे. त्यामुळे हरमनप्रीतवर सगळ्यांशी चर्चा करण्यात येईल. खेळाडू म्हणून ती भारतीय संघाचा महत्त्वाचा घटक आहे. पण, नेतृत्व बदलाची संघाला भविष्यात गरज आहे का, याचा विचार नक्की होईल,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं आहे. (Harmanpreet Kaur)

अलीकडेच भारताची माजी कर्णधार आणि ज्येष्ठ खेळाडू मिताली राजने (Mithali Raj) हरमनप्रीतवर भाष्य केलं होतं. ‘तुम्हाला नेतृत्वात बदल करायचा झाल्यास तो आताच करा. पुढील टी-२० विश्वचषक दोन वर्षांवर आहे. त्यामुळे आताच त्याची तयारी सुरू झाली पाहिजे. हे बघता नवीन संघ बांधणीसाठी गरज पडल्यास नेतृत्व बदलाचा निर्णयही घ्यावा लागेल. पण, ते करण्याची वेळ आता आहे. नंतर नाही. जेमिमा २४ वर्षांची आहे. शिवाय स्मृती हाही चांगली पर्याय आहे,’ असं मिताली राज पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली होती. (Harmanpreet Kaur)

(हेही वाचा- Mangaldas Bandal यांच्या घरावर ईडीची छापेमारी; ८५ कोटींची मालमत्ता जप्त)

यापूर्वी २०२० मध्ये भारतीय संघ या स्पर्धेत उपविजेता ठरला होता. पण, यंदा मात्र संघाची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नाही. (Harmanpreet Kaur)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.