Haris Rauf Viral Video : ‘तू इंडियन होगा, बाप को गाली दे रहा,’ पाकच्या हॅरिस रौफचा अमेरिकेत नाराज चाहत्यांबरोबर दंगा 

Haris Rauf Viral Video : पाक तेज गोलंदाज हॅरिस रौफचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

208
Haris Rauf Viral Video : ‘तू इंडियन होगा, बाप को गाली दे रहा,’ पाकच्या हॅरिस रौफचा अमेरिकेत नाराज चाहत्यांबरोबर दंगा 
Haris Rauf Viral Video : ‘तू इंडियन होगा, बाप को गाली दे रहा,’ पाकच्या हॅरिस रौफचा अमेरिकेत नाराज चाहत्यांबरोबर दंगा 
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानचा स्टार तेज गोलंदाज हॅरिस रौफ (Haris Rauf Viral Video) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत रौफ चाहत्याबरोबर वाद घालताना दिसतोय. विश्वचषकातील (T20 world cup) खराब कामगिरीनंतर चाहत्यांकडून पाकिस्तानी खेळाडूंची हुर्यो उडवली जातेय. त्यामुळे चवताळलेला हॅरिस रौफ हा चाहत्यावर चक्क धावून केला. (Haris Rauf Viral Video)

(हेही वाचा- Maharashtra BJP नेतृत्वात कोणताही बदल नाही; दिल्लीतील बैठकीत निर्णय)

हॅरिस रौफ (Haris Rauf Viral Video) याचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ अमेरिकेतील आहे. व्हिडिओमध्ये हॅरिस रौफ एका चाहत्याच्या अंगावर धावून जाताना दिसतोय. हॅरिस रौफला हा चाहता काहीतरी म्हणतो, ज्यानंतर तो चाहत्याच्या अंगावर धावून जातो. यावेळी त्याची चाहत्यासोबत बाचाबाची देखील होते. ‘तू इंडियन होगा’ असे म्हणत हॅरिस रौफ त्या चाहत्याच्या अंगावर धावून जातो. त्याची पत्नीला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो हात झटकत चाहत्याच्या अंगावर धावून गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसतेय. त्यानंतर उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी हॅरिस रौफ याला थांबवले, पण त्यांच्यामधील बाचाबाची मात्र सुरु राहिली. (Haris Rauf Viral Video)

तू इंडियन होगा… असे म्हणत हॅरिस रौफ यानं त्या चाहत्याला खडसवण्याचा प्रयत्न केला. पण त्या चाहत्यानं मी भारतीय नाही, तर पाकिस्तानी (Pakistan) असल्याचं उत्तर देत आपली नाराजी व्यक्त केली. विश्वचषकात पाकिस्तान संघाने अतिशय सुमार कामगिरी केली, साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले, त्यामुळे चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागता आहे. (Haris Rauf Viral Video)

(हेही वाचा- स्वारगेट ते मंत्रालय Shivneri Bus मंगळवारपासून अटल सेतूमार्गे धावणार, काय आहेत नियम? जाणून घ्या…)

2024 टी20 विश्वचषकात (T20 world cup) पाकिस्तानची कामगिरी फारच खराब राहिली. गतवेळचा उपविजेता पाक संघ यंदा सुपर 8 मध्येही पोहचू शकला नाही. यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंवर मायदेशात जोरदार टीका होत आहे. अनेक माजी खेळाडूंनी तर कर्णधार बाबर आझमसह संघातील स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली आहे.  हॅरिस रौफ आणि चाहत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. हॅरिस रौफ यानं त्या पाकिस्तानी चाहत्याचा बापही काढला. हॅरिस रौफ यानं घातलेला राडा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.  (Haris Rauf Viral Video)

 अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तान संघाला चार सामन्यात दोन पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिका आणि भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानला दुबळ्या कॅनडा आणि आयर्लंडविरोधात विजय मिळवता आला. आयर्लंडविरोधातही पाकिस्तानचा विजय रडतखडतच झाला. (Haris Rauf Viral Video)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.