Eng vs Pak, 1st Test Match : इंग्लंडचा ७ बाद ८२३ धावांचा डोंगर, हॅऱी ब्रूक, जो रुट यांचे फलंदाजीचे विक्रम 

Eng vs Pak, 1st Test Match : हॅरी ब्रूकने सर्वाद जलद त्रिशतक तर रुटने द्विशतक झळकावलं 

257
Eng vs Pak, 1st Test Match : इंग्लंडचा ७ बाद ८२३ धावांचा डोंगर, हॅऱी ब्रूक, जो रुट यांचे फलंदाजीचे विक्रम 
Eng vs Pak, 1st Test Match : इंग्लंडचा ७ बाद ८२३ धावांचा डोंगर, हॅऱी ब्रूक, जो रुट यांचे फलंदाजीचे विक्रम 
  • ऋजुता लुकतुके 

पाकिस्तान विरुद्ध मुलतान कसोटीत इंग्लिश फलंदाजांनी अक्षरश: धिंगाणा घातला आहे. पाकिस्तानच्या ५५६ या धावसंख्येला उत्तर देताना इंग्लंडने फक्त दोन दिवसांत ७ बाद ८२३ अशी धावसंख्या उभारली आहे. यात हॅरी ब्रूकचं वेगवान त्रिशतक आणि जो रुटचं द्विशतक हे इंग्लिश डावाचं वैशिष्ट्य ठरलं. इंग्लंडने या सामन्यात फलंदाजीचे अनेक विक्रम केले आहेत. प्रतिस्पर्धी गोलंदाजीवर हुकुमत गाजवणारी इंग्लंडची बॅझबॉल शैली पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे. एक नजर टाकूया कसोटीतील फलंदाजीच्या नव्या विक्रमांवर, सर्वाधिक धावसंख्या – कसोटीत चौथ्यांदा एखाद्या संघाने एका डावात ८०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. २१ व्या शतकात तर अशी कामगिरी पहिल्यांदाच घडली आहे. १९९७ मध्ये श्रीलंकेनं ६ बाद ९५२ धावा केल्या होत्या. तर १९३८ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ बाद ९०३ धावा केल्या होत्या. त्याहीपूर्वी १९३० मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंडने सर्वबाद ८३४ धावा केल्या होत्या.  (Eng vs Pak, 1st Test Match)

(हेही वाचा- Pune Hit and run : ऑडी चालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू)

पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठी भागिदारी – पाकिस्तान विरुद्ध कसोटीमध्ये सगळ्यात मोठी भागिदारी रचण्याचा विक्रम आता जो रुट आणि हॅरी ब्रूक यांच्या नावावर लागला आहे. मुलतान कसोटीत दोघांनी ४५४ धावांची भागिदारी केली. १९५८ मध्ये गॅरी सोबर्स आणि कॉनरेड हर्न यांनी ४५४ धावांची भागिदारी केली होती. तो विक्रम ब्रूक आणि रुट यांनी मोडला. तर २००६ मध्ये राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांनी होर कसोटीत ४१० धावांची भागिदारी केली होती. (Eng vs Pak, 1st Test Match)

जो रुट (Joe Root) – जो रुटने २३२ धावा केल्या. या दरम्यान कसोटींत सर्वाधिक धावा करणारा इंग्लिश फलंदाज ठरला आहे. त्याने ॲलिस्टर कूकला मागे टाकलं आहे. आता सचिन तेंडुलकरच्या १५,००० कसोटी धावांचा विक्रम जो रुटला खुणावत आहे. आणि सर्वाधिक कसोटी धावांच्या यादीत तेंडुलकर, पाँटिंग, कॅलिस आणि द्रविड यांच्या पाठोपाठ तो पाचव्या स्थानावर आहे. आणि या यादीत जो रुट तसंच विराट कोहली हे दोघंच खेळाडू सध्या क्रिकेट खेळत असलेले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये आगामी काळात स्पर्धा असणार आहे. विराट रुटपेक्षा ३,००० धावांनी पिछाडीवर आहे.  (Eng vs Pak, 1st Test Match)

(हेही वाचा- Rafael Nadal Retires : २२ ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदाल आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्त )

हॅरी ब्रूक (Harry Brooke) – हॅरी ब्रूकने या कसोटीत ३१७ धावा केल्या. १९९० मध्ये ग्रॅहम गूचच्या त्रिशतकानंतर इंग्लंडकडून ब्रूकने केलेलं हे पहिलं त्रिशतक आहे. इतकंच नाही तर चेंडूंचा सामना करण्याच्या निकषावर हे दुसरं वेगवान त्रिशतक आहे. इथं वेगवान त्रिशतकाचा मान विरेंद्र सेहवागकडे जातो. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २७८ चेंडूंतच ३०० धावा केल्या होत्या. ब्रूकने ३१० चेंडूंत त्रिशतक पूर्ण केलं. (Eng vs Pak, 1st Test Match)

६ गोलंदाजांनी दिल्या १०० हून जास्त धावा – एका कसोटीत, एका डावांत एका संघातील ६ गोलंदाजांनी शंभरहून धावा दिल्याची घटनाही कसोटीच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदा घडली आहे. यापूर्वी २००४ मध्ये झिंबाब्वेनं श्रीलंकेविरुद्ध ही नकोशी कामगिरी केली होती. (Eng vs Pak, 1st Test Match)

(हेही वाचा- १० मिनिटांत Ajit Pawar मंत्रिमंडळाच्या बैठकीतून का निघून गेले? कारण आलं समोर)

पाकिस्तानातील सर्वात मोठी धावसंख्या – पाकिस्तानमध्ये पाहुण्या संघाने केलेली ही उच्चांकी धावसंख्या आहे. यापूर्वी मुलतानमध्येच भारताने ५ बाद ६७५ धावा केल्या होत्या. (Eng vs Pak, 1st Test Match)

सर्वाधिक धावगती – एका डावांत संघाने ७०० पेक्षा जास्त दावा केल्या असताना ५.४८ ही इंग्लंडची धावगती कसोटीतील सर्वाधिक आहे (Eng vs Pak, 1st Test Match)

(हेही वाचा- Rohit Sharma : रोहित शर्माने जखमी मुंबईकर खेळाडू मुशीर खानची घेतली भेट )

पाकिस्तान विरुद्ध त्रिशतकं – पाकिस्तान विरुद्घ कसोटीत त्रिशतक करणारा हॅरी ब्रूक पाचवा फलंदाज ठरला आहे. गॅरी सोबर्सने सर्वाधिक ३६५ धावा केल्या होत्या. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर, मार्क टेलर आणि विरेंद्र सेहवागने पाक विरुद्ध त्रिशतक ठोकलं होतं. या यादीत आता हॅरी ब्रूकचा समावेश झाला आहे. (Eng vs Pak, 1st Test Match)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.