Duleep Trophy 2024 : मुशीर खानच्या शतकाखेरिज पहिला दिवस गोलंदाजांचाच

68
Duleep Trophy 2024 : मुशीर खानच्या शतकाखेरिज पहिला दिवस गोलंदाजांचाच
Duleep Trophy 2024 : मुशीर खानच्या शतकाखेरिज पहिला दिवस गोलंदाजांचाच
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या दुलिप करंडकाकडे (Duleep Trophy 2024) सगळ्यांचंच लक्ष आहे. कारण, निदान पहिल्या फेरीत तरी भारताचे काही स्टार खेळाडूही इथं खेळताना दिसत आहेत. आणि त्यांच्यासमोर देशांतर्गत खेळाडूंची कामगिरी कशी होते तसंच आगामी लांबलचक हंगामासाठी खेळाडू कशी तयारी करतात हे जोखण्याची ही शेवटची संधी आहे. अशावेळी दुलिप करंडकातील (Duleep Trophy 2024) पहिला दिवस हा बऱ्यापैकी गोलंदाजांचाच ठरला आहे. अपवाद सर्फराझ खानचा (Sarfaraz Khan) भाऊ मुशीर खानचा (Musheer Khan). अनंतपूरच्या सामन्यात भारत ड संघ पहिली फलंदाजी करत १६४ धावांत बाद झाला. तर भारत क संघाचीही अवस्था ४ बाद ९१ झाली आहे.

ड संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, देवदत्त पड्डिकल, यश दुबे हे सगळे फ्लॉप ठरले. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने ८६ धावा करत संघाला १६० धावांचा टप्पा गाठून दिला. त्याच्या खेरित इतर फक्त ४ फलंदाज दुहेरी आकडा जेमतेम गाठू शकले. यंदाच्या आयपीएलमध्ये लक्षवेधी ठरलेल्या विजयकुमार व्यक्षने १९ धावांत ३ बळी मिळवले. त्यानंतर क संघाची सुरुवातही अडखळती झाली आहे. आणि ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन स्वस्तात बाद झाल्यामुळे संघाची अवस्था ४ बाद ९१ आहे. संघाची मदार आता आहे ती अभिषेक पोरालवर.

(हेही वाचा – विधानसभेसाठी शिवसेनेची लाडक्या बहिणीवर मदार; असे का म्हणाले Sanjay Nirupam?)

तर दुसऱ्या सामन्यातही गोलंदाजांचंच वर्चस्व होतं. भारतीय ब संघाने पहिली फलंदाजी घेतल्यावर यशस्वी जयसवालने ३० धावा करत चांगली सुरूवात केली. पण, तो बाद झाल्यावर अभिमन्यू ईश्वर, सर्फराझ खान, नितिश रेड्डी, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांची रांगच लागली होती. पण, संघाची अवस्था ७ बाद ९४ अशी असताना तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मुशीर खानने एक बाजू लावून धरली. नवदीप सैनीबरोबर त्याने दिवस अखेर ११३ धावांची भागिदारीही केली आहे.

(हेही वाचा – Driving Licence चे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरणासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत)

मुशीर खान (Musheer Khan) हा दुलिप करंडकाच्या (Duleep Trophy 2024) पहिल्या दिवसाचा निर्विवाद हीरो ठरला. २२७ चेंडू किल्ला लढवताना त्याने २ षटकार आणि १० चौकार ठोकले. खलील अहमद, आवेश खान आणि आकाशदीप या तेज त्रिकुटाला त्याने दाद दिली नाही. तो १०५ धावांवर नाबाद आहे. महत्त्वाचं म्हणजे भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव या सामन्यात काहीसा निष्प्रभ ठरला. आणि आपल्या १४ षटकांत त्याने ५० धावा दिल्या. त्याला एकही बळी मिळाला नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.