Dilip Vengsarkar : बंगळुरूतील नवीन क्रिकेट अकादमीची दिलीप वेंगसरकर यांना भुरळ

Dilip Vengsarkar : बीसीसीआयच्या नवीन क्रिकेट अकादमीचं उद्गाटन शुक्रवारी होणार आहे. 

92
Dilip Vengsarkar : बंगळुरूतील नवीन क्रिकेट अकादमीची दिलीप वेंगसरकर यांना भुरळ
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्याच्या बीसीसीआय उच्चस्तरीय परिषदेचे सन्माननीय सदस्य दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी बंगळुरूमध्ये उभ्या राहात असलेल्या क्रिकेट अकादमीचं स्वागत केलं आहे. गेल्याच आठवड्यात अकादमीचं बांधकाम ते पाहून आले होते. अशा प्रकारची सरावाची सुविधा देशात उभी राहत असल्याबद्दल त्यांनी बीसीसीआयच अभिनंदन केलं. त्यानंतर गुरुवारी या अकादमीच्या तयारीविषयी बीसीसीआयची कार्यकारिणी आणि उच्चस्तरीय परिषदेच्या सदस्यांमध्ये एक छोटेखानी बैठक झाली. या बैठकीनंतर पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना वेंगसरकर यांनी अकादमीच्या कामाविषयी समाधान व्यक्त केलं.

नवीन अकादमी बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळच उभारण्यात आली आहे. या संकुलात ३ क्रिकेटची मैदानं, ४५ सरावासाठीच्या खेळपट्ट्या, ८ इनडोअर नेट्स, ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव, १६,००० वर्गमीटरच्या जागेत वसवलेलं अद्ययावत जिम आणि एक दुखापत पुनर्वसन केंद्रही असणार आहे.

(हेही वाचा – Chandrakant Bawankule यांची संजय राऊतांवर टीका ; म्हणाले राऊतांचा जन्मच…)

‘मी गेल्या आठवड्यात तिथे होते. तीनही मैदानं अगदी खेळण्यासाठी तयार आहेत. मुख्य मैदानात तर सीमारेषा ८५ यार्डांवर आहे. तिथल्या खेळपट्ट्याची तयार आणि चांगल्या आहेत. शुक्रवारपर्यंत सगळं काम पूर्ण झालेलं असेल याची मला खात्री आहे,’ असं वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

शनिवारी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी या क्रिकेट अकादमीचं उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे. बंगळुरूमधील या अकादमी व्यतिरिक्त आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पावर बीसीसीआय सध्या काम करत आहे. ईशान्येकडच्या देशात सहा इनडोअर क्रिकेट नेट्स उभारण्याचं कामही सूरू आहे. त्यामुळे मणिपूर, अरुणाचल प्रदेश, इटानगर, कोहिमा आणि आईझॉल इथले तरुण या अकादमींमध्ये सराव करू शकतील. त्यांना क्रिकेटसाठी राज्य सोडून बाहेर पडावं लागणार नाही. या वर्षाच्या अखेरीस या अकादमीही सुरू होतील. त्याचबरोबर वार्षिक सभेत मंजुरी मिळाल्यास बीसीसीआयच्या मुंबई कार्यालयाचंही नुतनीकरण करण्यात येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.