Deep Fake Video of Virat Kohli : विराट, शुभमनचा डीपफेक व्हीडिओ व्हायरल 

Deep Fake Video of Virat Kohli : विराट या व्हीडिओत चक्क शुभमनबद्दल वाईट बोलताना दिसतो आहे 

101
Deep Fake Video of Virat Kohli : विराट, शुभमनचा डीपफेक व्हीडिओ व्हायरल 
Deep Fake Video of Virat Kohli : विराट, शुभमनचा डीपफेक व्हीडिओ व्हायरल 
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीही डीपफेक (Deep Fake Video of Virat Kohli) व्हीडिओंचा बळी ठरला आहे. या एडिटेड व्हीडिओत विराट कोहलीची जुनी मुलाखत वापरली आहे. इथं विराट चक्क शुभमन गिलबद्दल (Shubman Gill) वाईट साईट बोलत आहे. क्रिकेटमध्ये दिग्गज म्हणून शुभमन नावारुपाला येणार नाही, असं विराट या मुलाखतीत म्हणतो. पण, त्याचा आवाज आणि चेहऱ्यावरील भावना या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने बदलण्यात आल्या आहेत. डीप फेक व्हीडिओमध्ये विराट म्हणतो, ‘मी ऑस्ट्रेलियातून परत आलो तेव्हा मला समजलं क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल. चांगला खेळाडू आणि दिग्गज खेळाडू यात फरक आहे. शुभमनला मी जेव्हा जेव्हा पाहतो. तेव्हा त्याच्यातील कौशल्य नजरेत भरतं. पण, फक्त कौशल्य आणि मिळणारं यश हे नेहमीच एकाच दिशेनं जातं असं नाही.’

(हेही वाचा- Passport Portal Shut: पासपोर्ट काढताय तर थांबा! आजपासून 5 दिवस देशभरात पोर्टल राहणार बंद)

फक्त इतकंच नाही तर विराट या व्हीडिओत स्वत:बद्दलही बोलताना दिसतो. अर्थात, हा व्हीडिओ फेक आहे. विराट म्हणतो, ‘विराट नंतर कोण याची चर्चा लोक अनेकदा करतात. पण, खरंतर विराट एकमेव आहे. त्याची जागा दुसरा कुणी घेऊ शकत नाही.’ (Deep Fake Video of Virat Kohli)

 विशेष म्हणजे ट्विटरवर कृत्रिम बुद्धिमत्तेची कमाल असं म्हणतच हा व्हीडिओ शेअर झाला आहे. यावर्षी दुसऱ्यांदा कोहलीचा असा डीप फेक व्हीडिओ शेअर होत आहे. यापूर्वी एका बेटिंग ॲपची जाहिरात करतानाचा त्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. आणि नंतर तो डीप फेक असल्याचं समोर आलं होतं.  (Deep Fake Video of Virat Kohli)

(हेही वाचा- Jay Shah : जय शाहांना आयसीसीच्या १५ सदस्य देशांचा पाठिंबा; पाकिस्तानने काय केलं असेल?)

विराट आणि शुभमनचा नवीन व्हीडिओ काहीही सांगत असला तरी मैदानावर आणि मैदानाबाहेर विराट आणि शुभमन (Shubman Gill) चांगले मित्र आहेत. आगामी दुलिप करंडक स्पर्धेत शुभमन भारतीय ए संघाचं नेतृत्व करणार आहे. तर विराट कोहली सध्या आपल्या कुटुंबीयांबरोबर लंडनला आहे. आणि बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत तो भारतीय संघात दिसेल.  (Deep Fake Video of Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.