Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा अचंबित करणारा ८९९ वा गोल

Cristiano Ronaldo : फ्री किकवर केलेला हा गोल डोळ्यांचं पारणं फेडणारा होता

125
Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा अचंबित करणारा ८९९ वा गोल
Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा अचंबित करणारा ८९९ वा गोल
  • ऋजुता लुकतुके

ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) सध्या सौदी अरेबियात अल नासिर संघाकडून खेळतोय. बुधवारी बुरेदा इथं अल फेहा संघाविरुद्ध सामन्यात त्याने आपली करामत दाखवून देताना फ्री किकवर एक अप्रतिम गोल केला. त्याच्या कारकीर्दीतील हा ८९९ वा गोल होता. अल नासरला ४-१ असा विजय मिळवून देण्यात रोनाल्डोने मोठी भूमिका बजावली. फुटबॉलमधील एक सर्वोत्तम स्ट्रायकर मानला जाणारा रोनाल्डो पूर्ण सामन्यात चांगल्याच फॉर्ममध्ये होता. पण, अचंबित करणारा तो गोल झाला तो ६४ व्या मिनिटाला.

(हेही वाचा- Passport Portal Shut: पासपोर्ट काढताय तर थांबा! आजपासून 5 दिवस देशभरात पोर्टल राहणार बंद)

फ्री किकवर रोनाल्डोने चेंडूवर जो ताबा मिळवला तो गोल करूनच तो थांबला. फ्री किकवर गोल करण्याच्या बाबतीत आता रोनाल्डो लायनेल मेस्सीपेक्षा फक्त एका गोलने मागे आहे. विशेष म्हणजे सलग २३ व्या फ्री किकवर त्याने गोल करून दाखवला आहे. यातून त्याची खेळावरील हुकुमत सिद्ध होते. (Cristiano Ronaldo)

Insert tweet – https://twitter.com/AlNassrFC_EN/status/1828536983045411318

अर्थात, अल नासिरसाठी टलिस्का आणि मार्सेलो ब्रोझोविक (Marcelo Brozovic) यांनीही चांगली कामगिरी केली. टलिस्काने तर दोन गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसरं म्हणजे या हंगामातील अल नासरचा हा पहिलाच विजय होता. या आधीच्या अल रईद विरोधातील सामन्यात संघाला १-१ अशी बरोबरी स्वीकारावी लागली होती. या मोठ्या विजयानंतर अल नासिर संघ आता गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. (Cristiano Ronaldo)

Insert tweet – https://twitter.com/CristianoXtra_/status/1828511527168811411

३९ वर्षीय रोनाल्डोचा हा सौदी फुटबॉलमधील दुसरा हंगाम आहे. गेल्यावर्षी त्याने ४५ सामन्यांत ४४ गोल केले होते. तर १३ गोलमध्ये त्याने सहायताही केली होती. या हंगामातही त्याने सौदी चषकातील २ धरून एकूण ४ गोल केले आहेत. फ्री किकवर त्याने केलेला गोल हा या हंगामातील सर्वोत्तम गोलपैकी एक गोल ठरावा. (Cristiano Ronaldo)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.