Chess Olympiad : दोन्ही भारतीय संघांची विजयी सुरुवात; मोरोक्को, जमैकावर मात

Chess Olympiad : पुरुष व महिला बुद्धिबळ संघांनी दिमाखात विजय मिळवले.

82
Chess Olympiad : दोन्ही भारतीय संघांची विजयी सुरुवात; मोरोक्को, जमैकावर मात
  • ऋजुता लुकतुके

४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये (Chess Olympiad) भारताच्या पुरुष व महिला संघांनी पहिल्या फेरीत दिमाखदार विजय मिळवले आहेत. पुरुषांनी मोरोक्कोचा ४-० असा फडशा पाडला. तर महिलांनी जमैकावर ३.५ विरुद्ध ०.५ असा विजय मिळवला. पुरुषांच्या पहिल्या फेरीत भारताकडून डी गुकेश खेळला नाही. त्याच्या अनुपस्थितीत प्रग्यानंदाने भारतीय चमूचं नेतृत्व केलं. पहिल्याच सामन्यात मोरोक्कोच्या तिसिर महम्मदचा सिसिलियन बचावाच्या रणनीतीने पराभव केला. प्रग्यानंदाच्या पाठोपाठ विदिथ गुजराती, अर्जुन एरिगसी आणि हरिकृष्णा यांनी सलग विजय मिळवत भारताला ४-० असा विजय मिळवून दिला.

(हेही वाचा – Virat & Rohit : भारतीय संघात विराट आणि रोहितची जागा कोण घेणार?)

प्रग्यानंदला सामन्यात सुरुवातीलाच चांगली आघाडी मिळाली. शिवाय प्रतिस्पर्धी तिसिरच्या चुकांचाही त्याला फायदा उचलता आला. तर विदित गुजराथीने सुरुवातीला प्रतिस्पर्ध्याचं एक प्यादं मारलं. तिथून त्याला मिळालेला वरचष्मा त्याने शेवटपर्यंत कायम राखला. दोघांच्या तुलनेत एरिगसीला प्रतिस्पर्ध्याने चांगली लढत दिली. पण, एरिगसीने एका प्याद्याचा बळी देण्याची रचलेली चाल प्रतिस्पर्ध्याला कळली नाही. तिथेच डाव त्याच्या हातात आला. अखेर पटावर एरिगसीकडे एक हत्ती जास्त असताना प्रतिस्पर्ध्याने हार पत्करली. (Chess Olympiad)

(हेही वाचा – Jitendra Awhad यांचे ‘ते’ विधान समाजात तणाव निर्माण करणारेच; उच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला सुनावणी घेण्याचे आदेश)

महिलांमध्ये आर वैशाली, दिव्या देशमुख आणि तानिया सचदेव यांनी आपले तीनही सामने जिंकून भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर वंतिका अगरवालचा रेहाना ब्राऊनबरोबरचा सामना बरोबरीत सुटला. अखेर जमैकाविरुद्ध भारतीय महिलांनी ३.५ विरुद्ध ०.५ असा विजय मिळवला. (Chess Olympiad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.