Champions Trophy 2025 : पाकिस्तानकडून काढलं जाईल चॅम्पियन्स करंडकाचं यजमानपद?

Champions Trophy 2025 : पाकिस्तान सध्या चॅम्पियन्स करंडक आपल्याकडे राखण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे.

205
Champions Trophy 2024 : चॅम्पियन्स करंडकचं अखेर ठरलं, पाकिस्तान हायब्रीड मॉडेलसाठी तयार
Champions Trophy 2024 : चॅम्पियन्स करंडकचं अखेर ठरलं, पाकिस्तान हायब्रीड मॉडेलसाठी तयार
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडकाविषयी एखादा महत्त्वाचा निर्णय येत्या दिवसांत होऊ शकतो. आणि तो पाकिस्तानसाठी धक्कादायक ठरू शकतो. इतके दिवस पाकिस्तानने स्पर्धेच्या आयोजनासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत. स्पर्धा संपूर्णपणे पाकिस्तानमध्येच व्हावी यासाठी ते आग्रही आहेत. पण, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात, आयसीसी याविषयी काही विपरित निर्णयही घेऊ शकते. एकतर पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेतलं जाऊ शकतं किंवा पाकिस्तानला हायब्रीड मॉडेल स्वीकारण्याचा पर्याय समोर ठेवला जाऊ शकतो. (Champions Trophy 2025)

इतकंच नाही, तर आयसीसीने त्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे. स्वतःसमोर तीन पर्याय ठेवले आहेत. पहिला पर्याय म्हणजे संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानात आयोजित करणे. दुसरा पर्याय म्हणजे हायब्रीड मॉडेल, जे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अधिकारी स्वीकारण्यास नकार देत आहेत. हायब्रीड मॉडेल अंतर्गत, फक्त भारताचे सामने इतरत्र आयोजित केले जातील, उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये होतील. तिसरा पर्याय म्हणजे संपूर्ण टूर्नामेंट पाकिस्तानमधून दुसऱ्या देशात हलवणे, ज्यासाठी दक्षिण आफ्रिका, यूएई आणि श्रीलंका यांची नावे पुढे आली आहेत. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Jogeshwari East Assembly Constituency : पुन्हा वायकर विरुद्ध किर्तीकर )

हायब्रीड मॉडेलचा तोडगा शेवटी सगळ्यांसाठी फायद्याचा असेल हे नक्की आहे. कोंडीत सापडलेला पाकिस्तान अखेर या पर्यायासाठी होकार देईल अशीही आशा आहे. पण, त्याचवेळी आयसीसीने इतर तीन ठिकाणी स्पर्धा भरवण्यासाठी आर्थिक अंदाजपत्रक तयार करायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत भारताच्या सामन्यांव्यतिरिक्त इतर सर्व सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. ही संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानबाहेर इतर कोणत्याही देशात आयोजित करणे सोपे नाही, परंतु पीसीबीसाठी ही चांगली बातमी नाही. (Champions Trophy 2025)

नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत या विषयावर कोणतीही स्पष्ट घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, भारत सरकारनेही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.