Champions Trophy 2025 : पाक बोर्ड चॅम्पियन्स करंडकाच्या तारखा बदलणार?

93
Champions Trophy 2025 : भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकासाठी पाकला जाणार का? सचिव जय शाह काय म्हणाले?
  • ऋजुता लुकतुके

पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडकाविषयीची चर्चा कमी होण्याचं नाव घेत नाहीए. इतके दिवस ही चर्चा भारतीय संघ सहभागी होणार की नाही, यावर केंद्रीत होती. आता पाकिस्तानने स्पर्धेच्या तारखाच पुढे ढकलण्याची तयारी चालवली असल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. स्टेडिअमची उभारणी वेळेत पूर्ण झाली नाही, तर स्पर्धा पुढे ढकलावी लागेल असं सांगणारा एक व्हीडिओ मीडियाटेक या युट्यूब वाहिनीने दाखवला होता. आणि यात पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांचीच मुलाखत दाखवली आहे. यावर आता पाक बोर्डाने अधिकृत पत्रक काढून स्पर्धा ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचं जाहीर केलं आहे. (Champions Trophy 2025)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, काही प्रसारमाध्यमांनी पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या विधानाचा उलटा अर्थ घेतला हे निराशाजनक आहे. या मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत असे सांगण्यात आले की, सुरक्षेच्या कारणास्तव आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या तारखांमध्ये बदल शक्य आहे. त्यानंतर लोकांमध्ये चुकीच्या बातम्या पसरल्या. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Badlapur School Case : आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी)

ते पुढे म्हणाले, ‘मीडिया टॉकचा व्हिडिओ पीसीबीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. या व्हिडिओमध्ये पीसीबी अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, तीनही स्टेडियममध्ये सुरू असलेले काम निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल. यादरम्यान त्यांनी असेही सांगितले होते की, या बांधकामामुळे देशांतर्गत सामनेही स्थलांतरित केले जाऊ शकतात. याचा आयसीसी टूर्नामेंटशी काहीही संबंध नाही. पीसीबी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदासाठी सज्ज आहे. (Champions Trophy 2025)

निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानमधील तीन प्रतिष्ठित ठिकाणी जागतिक दर्जाची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन करण्यासाठी पाक बोर्ड  पूर्णपणे वचनबद्ध आहे, देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक खास क्षण असणार आहे. पुढील वर्षी १७ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये ही स्पर्धा होणार आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Mahaparinirvan Express : महापरिनिर्वाण एक्स्प्रेसमध्ये काय सुविधा आहेत?)

भारत चॅम्पियन्स करंडक खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आयसीसी भारतीय संघासाठी हायब्रीड मॉडेलला मान्यता देऊ शकते अशीही अटकळ बांधली जात आहे. मात्र चॅम्पियन्स करंडकाचे सर्व सामने पाकिस्तानमध्येच खेळवले जातील, अशी भूमिका पीसीबीने घेतली आहे. आणि याचा अंतिम निर्णय आयसीसीला घ्यायचा आहे. (Champions Trophy 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.