Champions Trophy 2025 : जोस बटलर इंग्लंडचे कर्णधारपद सोडणार ! कारण आलं समोर …

67
Champions Trophy 2025 : जोस बटलर इंग्लंडचे कर्णधारपद सोडणार ! कारण आलं समोर ...
Champions Trophy 2025 : जोस बटलर इंग्लंडचे कर्णधारपद सोडणार ! कारण आलं समोर ...

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मधील इंग्लंड (England) क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील इंग्लंडच्या संघाचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध इंग्लंड असणार आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून जोस बटलरचा शेवटचा एकदिवसीय सामना असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौराही निराशाजनक होता. जॉस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका 0-3 ने गमावली होती. (Champions Trophy 2025)

जोस बटलर काय म्हणाला ?
बटलर म्हणाला की, मी इंग्लंड संघाचे कर्णधारपद सोडत आहे. माझ्यासाठी आणि संघासाठी हा निर्णय योग्य आहे. कोणीतरी येईल आणि बाझसोबत (मॅककुलम) काम करेल आणि संघाला जिथे असायला हवे तिथे घेऊन जाईल. माझ्या नेतृत्वात ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची होती. पण, निकाल आमच्या मनासारखा लागला नाही. त्यामुळे कर्णधार पदावरून बाजूला होण्याची हीच योग्य वेळ आहे असे मला वाटते. (Champions Trophy 2025)

इंग्लंड क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर
बटलरने जून 2022 मध्ये कर्णधारपद सांभाळताना इंग्लंडला 2022 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. अलीकडच्या स्पर्धामध्ये इंग्लंडला संघर्ष करावा लागला. एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्यांना विजेतेपद राखण्यात अपयश आले. जॉस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट संघाकडून अशी खराब कामगिरी अपेक्षित नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 351 धावांची मोठी धावसंख्या उभारूनही संघाचा 5 गडी राखून पराभव झाला. दुसऱ्या सामन्यातही मोठा उलटफेर पाहायला मिळाला. अफगाणिस्तानने त्यांचा 8 धावांनी पराभव केला. या पराभवानंतरच इंग्लंड क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला. (Champions Trophy 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.