Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी आयसीसी पाकिस्तानला देणार ७० दशलक्ष अमेरिकन डॉलर

Champions Trophy 2025 : यात भारताने पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला तर या मुद्याचा विचार करून हे बजेट आखलं आहे 

99
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानची भारताशी टक्कर; भारताऐवजी श्रीलंकेला संधी?
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानची भारताशी टक्कर; भारताऐवजी श्रीलंकेला संधी?
  • ऋजुता लुकतुके

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने पाकिस्तानचं ७० दशलक्ष अमेरिकन डॉलरचं बजेट मंजूर केलं आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स करंडकाचं हे बजेट आहे. विशेष म्हणजे यात भारताने पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला किंवा काही सामने अशा कारणास्तव पाकिस्तान बाहेर हलवावे लागले अशा शक्यतांचा विचार करून अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Sion Bridge : वाहतुकीसाठी सायन पूल बंद! ऑफिसला जाणारे कर्मचारी वाहतुक कोंडीत अडकले)

आयसीसीच्या अर्थविषयक समितीचे अध्यक्ष जय शाहच (Jay Shah) आहेत. त्यांच्या चमूने या बजेटचा अभ्यास करून निधीला मंजुरी दिली आहे. ‘पाकिस्तानने सादर केलेलं बजेट हे साधारणपणे ७० दशलक्ष अमेरिकन डॉलरचं आहे. तर अतिरिक्त पैसे म्हणून ४.५ दशलक्ष डॉलर बाजूला ठेवण्यात आले आहेत,’ असं आयसीसीच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. (Champions Trophy 2025)

बीसीसीआयने (BCCI) आतापर्यंत पाकिस्तानला संघ न पाठवण्याचीच भूमिका घेतली आहे. अशावेळी भारताचे सामने पाकिस्तान बाहेर खेळवले जाऊ शकतात. तशी वेळ आल्यास पाकिस्तानला ४.५ दशलक्ष रुपयांचा अतिरिक्त निधी मिळू शकेल. भारत आणि पाकिस्तानचे संघ २००८ नंतर द्विपक्षीय मालिका खेळलेले नाहीत. फक्त आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्येच हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने आले आहेत. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Kalyan Hoarding Collapse: महाराष्ट्रात पुन्हा होर्डिंग कोसळले! ३ वाहनं चिरडली, व्हिडिओ व्हायरल)

आता चॅम्पियन्स करंडक स्पर्धाच पाकिस्तानमध्ये होणार असल्यामुळे हा प्रश्न नव्याने समोर आला आहे. गेल्यावर्षी आशिया चषक स्पर्धेत भारताचे सामने श्रीलंकेला हलवण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानने भारताला पाकमध्ये खेळण्याची गळ घातली आहे. पण, त्यासाठी केंद्रसरकार परवानगी देत नसल्याचा बीसीसीआयचा दावा आहे. (Champions Trophy 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.