Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाविषयीचा निर्णय केंद्र सरकारच घेणार, बीसीसीआयचा पुनरुच्चार

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडक पुढील वर्षी फेब्रुवारीत पाकिस्तानमध्ये होणार आहे.

72
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाविषयीचा निर्णय केंद्र सरकारच घेणार, बीसीसीआयचा पुनरुच्चार
  • ऋजुता लुकतुके

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी चॅम्पियन्स करंडकासाठी पुढील वर्षी पाकिस्तानला संघ पाठवायचा की नाही, याचा निर्णय केंद्र सरकारचं घेईल असं स्पष्ट केलं. पुढील वर्षी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा (Champions Trophy 2025) खेळवली जाणार आहे. पाकिस्तान भारताने तिथेच जाऊन खेळावे यासाठी आग्रही आहे. पण, भारताने अजून आपल्या सहभागाविषयी निर्णय घेतलेला नाही. भारतीय संघाचे सामने दुबई किंवा श्रीलंकेला हलवावे अशी भारताची मागणी आहे.

या मुद्यावर आतापर्यंत अनेकदा आयसीसीच्या बैठकांमध्ये भारत व पाकिस्तान क्रिकेट मंडळं समोरासमोर आली आहेत. यंदा बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर पत्रकारांनी पुन्हा तोच प्रश्न कार्यकारिणीला विचारला. त्यावर राजीव शुक्ला यांनी उत्तर दिलं. ‘भारतातून पाकिस्तानला जाण्यासाठी कुणालाही केंद्र सरकारची परवानगी लागते. याबाबतीतही खेळाडूंना पाकिस्तानला पाठवायचं की नाही, याचा निर्णय केंद्र सरकारच घेईल. ते जो निर्णय घेतील त्याचं बीसीसीआय पालन करेल,’ असं शुक्ला म्हणाले. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Sunita Williams आणि बुच विल्मोर यांना अंतराळातून परत आणण्याच्या हालचाली सुरु)

गेल्यावर्षी पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धा (Champions Trophy 2025) पार पडली. पण, यातील भारताचे सामने हे श्रीलंकेत झाले. बीसीसीायने तेव्हा पाकिस्तान दौऱ्याला भारत सरकारने परवानगी नाकारल्याचं कारण दिलं होतं. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत ८ देश सहभागी होणार असून पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये प्रस्तावित आहे. १९९६ मध्ये पाकिस्तान, भारत आणि श्रीलंकेत संयुक्तरित्या झालेला एकदिवसीय विश्वचषक सोडला तर पाकिस्तानमध्ये कुठलीही मोठी क्रिकेट स्पर्धा झालेली नाही. आणि आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चॅम्पियन्स करंडकाकडून अपेक्षा आहेत.

दुसरीकडे, भारतीय संघ २००८ पासून पाकिस्तानला गेलेला नाही. आणि भारतीय नागरिकांना पाकिस्तानमध्ये जायचं असल्यास त्यासाठी केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाची विशेष परवानगी लागते. यापूर्वी अशी परवानगी घेऊन भारताचा लॉन टेनिस संघ गेल्यावर्षी डेव्हिस चषकाच्या सामन्यासाठी पाकिस्तानला गेला होता. दोन दिवसांचा हा दौरा होता. पण, १५ जणांच्या क्रिकेट संघाला केंद्र सरकार अशी परवानगी देईल का हा खरा प्रश्न आहे. तोपर्यंत बीसीसीआयने आयसीसीकडे भारतीय संघाचे सामने दुबई किंवा श्रीलंकेला हलवण्याची विनंती करण्याचं ठरवलं आहे. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.