-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) विजेता भारतीय संघ हळू हळू मायदेशी परतत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (gautam gambhir) सोमवारी रात्री नवी दिल्लीत तर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रात्री आठ वाजता मुंबईत दाखल झाला. इतर खेळाडूही आपापल्या गावी परतत आहेत. रोहितबरोबर त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायराही होती. बाद फेरीपासून बीसीसीआयने खेळाडूंना सपत्नीक दुबईत राहण्याची परवानगी दिली होती. रोहितचं (Rohit Sharma) मुंबई विमानतळावर जंगी स्वागत झालं. (Champions Return)
VIDEO | Indian skipper Rohit Sharma (@ImRo45) arrived at his home in Worli, Mumbai, earlier today after India’s historic win against New Zealand in Dubai.
(Full video available on PTI Videos – https://t.co/dv5TRAShcC)#ICCChampionsTrophy #iccchampionstrophy2025 pic.twitter.com/Est7B2xyFY
— Press Trust of India (@PTI_News) March 10, 2025
तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही (gautam gambhir) नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाला. तिथे दिल्ली क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयचे (BCCI) काही पदाधिकारी त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. गौतम गंभीर (gautam gambhir) मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघाला मिळालेलं हे पहिलं मोठं यश आहे. आणि ही स्पर्धा गंभीरची परीक्षा म्हणून पाहिली जात होती. इतर खेळाडूही दुबईतून रवाना झाले आहेत. यातील काही कुटुंबीयांबरोबर छोटीसी सुटी घालवून मग भारतात येणार आहेत. (Champions Return)
(हेही वाचा – Thane Municipal Corporation देणार विनामूल्य शाडू माती; मूर्ती घडविण्यासाठी जागा)
View this post on Instagram
(हेही वाचा – ‘Falcon Platform’च्या जाळ्यात न्यायाधीशच अडकले; साडेतेरा लाखांचा बसला फटका!)
रविवारी भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकाच्या (Champions Trophy) अंतिम फेरीत न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव करत ही स्पर्धा विक्रमी तीनदा जिंकली आहे. तर अगदी अलीकडच्या काळात भारतीय संघाने टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडक असे दोन आयसीसी चषक एका वर्षाच्या आत जिंकले आहेत. (Champions Return)
चॅम्पियन्स करंडकानंतर (Champions Trophy) आता खेळाडू आयपीएलच्या अठराव्या हंगामासाठी आपापल्या फ्रँचाईजीमध्ये दाखल होतील. मुंबई इंडियन्ससह अनेक संघांनी आपला सराव सुरूही केला आहे. २२ मार्चला कोलकाता इथं आयपीएलचा नवीन हंगाम सुरू होत आहे. (Champions Return)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community