-
ऋजुता लुकतुके
ॲडलेडची दिवस – रात्र कसोटी अपेक्षेप्रमाणेच तिसऱ्या दिवशी सकाळी संपली. निकाल भारताच्या विरोधात लागला. भारताचा दुसरा डाव रविवारी सकाळी १७५ धावांत गडगडला. विजयासाठी आवश्यक १९ धावा ऑस्ट्रेलियन संघाने ४ षटकांत १० गडी राखून पूर्णही केल्या. या विजयाबरोबरच मालिकेतही ऑस्ट्रेलियन संघाने १-१ अशी बरोबरी साधली आहे. कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून भारतीय संघाने फक्त ८१ षटकं खेळली. तिथेच भारताचा पराभव स्पष्ट झाला. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा- सशस्त्र सेना ध्वजनिधीला सर्वांचे योगदान गरजेचे – राज्यपाल C. P. Radhakrishnan)
पहिल्या डावात १५७ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या डावातही चांगली फलंदाजी करता आली नाही. यशस्वी जयसवाल (२४), शुभमन गिल (२८), रिषभ पंत (२८) आणि नितिश कुमार रेड्डी (४२) या चौघांनी चांगली सुरुवात केली. पण, त्यांना मोठी खेळी साकारती आली नाही. तर अनुभवी विराट कोहली उजव्या यष्टीबाहेरील चेंडू खेळताना नेहमीप्रमाणे बाद झाला. तर रोहित शर्मा मधल्या फळीतही अपयशीच ठरला. दोन्ही डावांत मिळून त्याने फक्त ९ धावा केल्या. या कसोटीत भारतीय संघाने वॉशिंग्टन सुंदर ऐवजी रवीचंद्रन अश्विनला संधी दिली. पण, अश्विन बॅट किंवा चेंडूनेही कमाल दाखवू शकला नाही. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
Massive win in Adelaide for Australia as they level the series 1-1 💪#WTC25 | #AUSvIND 📝: https://t.co/D4QfJY2DY1 pic.twitter.com/RXZusN98wU
— ICC (@ICC) December 8, 2024
पहिल्या डावांत मिचेल स्टार्कने डावांत ५ बळी घेतले होते. तर दुसऱ्या डावात पॅट कमिन्सने ५७ धावांत ५ बळी मिळवले. आणि विराट आणि शुभमन हे महत्त्वाचे बळी स्कॉट बोलंडने मिळवले. पर्थ कसोटीत भारतीय संघाने दोन्ही डावांत मिळून १९० षटकं फलंदाजी केली होती. या वेळेत भारताने ६०० धावा केल्या. पण, ॲडलेडमध्ये ८० षटकांत भारताच्या धावा होत्या जेमतेम ३७०. हा फरक निर्णायक ठरला. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा- दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा धुरा सांभाळण्यासाठी Devendra Fadnavis सज्ज)
शिवाय गुलाबी चेंडूवर संध्याकाळी प्रकाशझोतात खेळणं भारताला जमलं नाही. भारताच्या दोन्ही डावांत हानी झाली ती संध्याकाळी गुलाबी चेंडूने खेळतानाच. मालिकेत आता १-१ अशी बरोबरी आहे. तिसरी कसोटी १४ डिसेंबरला सुरू होणार आहे. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community