Border-Gavaskar Trophy 2025 : भारतीय संघाच्या सरावाची झलक, सर्फराझच्या कोपरावर झाला आघात, विराटला बघण्यासाठी चाहत्याने लढवली शक्कल

Border-Gavaskar Trophy 2025 : पर्थमध्ये भारतीय संघाचा जोरदार सराव सुरू आहे. 

93
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेड कसोटीत असा असेल भारताचा अंतिम संघ
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाची पर्थ कसोटीसाठीची तयारी सुरूच आहे. गुरुवारी भारताचा युवा फलंदाज सर्फराझ खानच्या उजव्या कोपरावर एक उसळलेला चेंडू बसल्यामुळे त्याला सराव अर्धवट सोडावा लागला. त्याला झालेली दुखापत किती गंभीर आहे याविषयी अजून स्पष्टता नाही. फॉक्स न्यूज या ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या वृत्त वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत सर्फराझ कोपर डाव्या हाताने झाकून मैदान सोडताना दिसतो. (Border-Gavaskar Trophy 2025)

पर्थच्या पहिल्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मा खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सर्फराझचं भारतीय संघातील स्थान निश्चित आहे. शिवाय आतापर्यंतचा न्यूझीलंडविरुद्धचा फॉर्म पाहता, सर्फराझ मधल्या फळीतील भारताचा प्रमुख फलंदाज आहे. त्यामुळे सर्फराझची तंदुरुस्ती भारतासाठी महत्त्वाची आहे. (Border-Gavaskar Trophy 2025)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाचे यजमान म्हणून आयसीसीच्या व्हिडिओत पाकिस्तानच)

दुसरीकडे, विराट कोहली पर्थला आल्यापासून फलंदाजीचा कसून सराव करताना दिसतो. गुरुवारीही विराटने सलग दोन तास नेट्समध्ये सराव केला. तो उसळत्या चेंडूंचा समर्थपणे मुकाबला करताना दिसतो आहे. शिवाय त्याच्या फलंदाजीत आता आत्मविश्वासही दिसत आहे. विराट ऑस्ट्रेलियात लोकप्रिय आहे. आताही भारतीय संघाचा पर्थमधील सराव गुप्त ठेवण्यात येत असला तरी विराट पाहण्यासाठी चाहते गर्दी करताना दिसतात. फॉक्स न्यूजच्या व्हिडिओतच चाहते उंच झाडावर चढून विराटची फलंदाजी पाहताना दिसतात. (Border-Gavaskar Trophy 2025)

२२ नोव्हेंबरला पर्थ कसोटीची सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा या कसोटीत खेळला नाही तर त्या जागेसाठी के. एल. राहुल, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल यांच्यात स्पर्धा असेल. (Border-Gavaskar Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.