Border-Gavaskar Trophy 2024 : जखमी खलील अहमदच्या जागी यश दयाल पोहोचला ऑस्ट्रेलियात

Border-Gavaskar Trophy 2024 : दयाल भारताच्या टी-२० संघाबरोबर दक्षिण आफ्रिकेत होता.

84
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेड कसोटीत असा असेल भारताचा अंतिम संघ
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियात पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. राखीव खेळाडूंमध्ये असलेला खलील अहमद दुखापतीमुळे भारतात परतला आहे. त्याच्या जागी डावखुरा तेज गोलंदाज यश दयाल ऑस्ट्रेलियात येणार आहे. खलीलच्या दुखापतीचं स्वरुप मात्र संघ प्रशासनाने अजून स्पष्ट केलेलं नाही. दयाल बांगलादेश विरुद्ध भारताच्या कसोटी संघात होता. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही संघाचा भाग होता. पण, या दोन्ही मालिकांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. (Border-Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : सट्टा बाजारचा कौल कोणाला? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार?)

जोहानसबर्गमध्ये असतानाच त्याला ऑस्ट्रेलियासाठी निवड झाल्याची बातमी मिळाली आणि तो ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. खलीलला सध्या विश्रांतीची गरज असल्याचं वैद्यकीय चमूने सांगितलं आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात सिम्युलेशन पद्धतीने सराव करत आहे. म्हणजे संघातील गोलंदाज विरुद्ध फलंदाज अशा सरावादरम्यानच्या लढती आयोजित करून भारतीय संघ सराव करत आहे. त्यामुळे राखीव खेळाडूंचीही संघाला तितकीच गरज आहे. त्यामुळेच यश दयालला तातडीने आफ्रिकेतून बोलावून घेण्यात आलं आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा – Praniti Shinde यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा; शिवसेना उबाठाचे नेते शरद कोळी यांची मविआकडे मागणी)

‘भारतीय संघ मिचेल स्टार्कसाठी खास सराव करत आहे. त्यामुळे डावखुऱ्या गोलंदाजाची संघाला नक्कीच गरज आहे. यश आधी भारतीय अ संघाबरोबर ऑस्ट्रेलियातच असणार होता. पण, आफ्रिकन दौऱ्यावर त्याची निवड झाली आणि तो तिथे गेला. आता खलील गोलंदाजीच करू शकणार नसल्यामुळे दयालला इथं बोलावण्यात आलं आहे,’ असं भारतीय संघाशी संबंधित सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. खलील भारतात परतला असून तो सय्यद अली टी-२० चषकात खेळेल की नाही हे अजून स्पष्ट नाही. यश दयालला बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाने आपल्याकडे कायम राखलं आहे. तर खलील मेगा लिलावाच्या प्रक्रियेतून जाईल. (Border-Gavaskar Trophy 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.