Border-Gavaskar Trophy 2024 : रोहित शर्मा, शुभमन गिल पहिल्या कसोटीतून आऊट, कुणाला मिळणार संधी?

Border-Gavaskar Trophy 2024 : रोहित सुट्टीवर तर शुभमन गिलचं बोट मोडलं आहे.

105
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेड कसोटीत असा असेल भारताचा अंतिम संघ
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर गावस्कर चषकाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला एक धक्का बसला आहे तो शुभमन गिलच्या दुखापतीचा. त्याशिवाय रोहित शर्माही पहिली कसोटी खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आघाडीच्या फळीत दोन जागा रिक्त झाल्या आहेत. तर संघाचं नेतृत्व जसप्रीत बुमराह करणार आहे. आगामी पर्थ कसोटीत आता रोहित शर्मा आणि शुभमन यांची जागा कोण घेणार हा प्रश्न आहे. संघ प्रशासनाने तातडीने निर्णय घेत भारताने देवदत्त पड्डिकलला राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियात कायम ठेवलं आहे. तो भारतीय अ संघाचा भाग म्हणून ऑस्ट्रेलियातच होता. तर अलीकडेच भारताच्याच दोन संघांमध्ये झालेल्या सराव सामन्यातही त्याने भाग घेतला होता. (Border-Gavaskar Trophy 2024)

त्यामुळे तो पर्थ इथंच आहे. त्याला आता भारतीय संघाबरोबरच ठेवलं जाईल. भारतीय अ संघाकडून खेळताना देवदत्त पड्डिकलने ४ डावांमध्ये ३६, ८८, २६ आणि १ अशा धावा केल्या आहेत. भारतीय संघात समावेश झाल्यास तोच तिसऱ्या क्रमांकावर खेळेल असं बोललं जात आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा – Delhi air Pollution : हवा झाली विषारी, दिल्लीत अकरावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद)

पड्डिकल यावर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्ध एक कसोटी सामना खेळला होता आणि यात त्याने ६५ धावाही केल्या होत्या. आताही त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली आणि कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू हर्षित राणालाही भारताचे प्रशिक्षक हर्षित राणा यांची पसंती दिसत आहे. त्यामुळे हर्षितला कसोटीत पदार्पण करण्याची संधी आहे. ‘भारताच्याच दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात हर्षित राणा सगळ्यात प्रभावी ठरला होता आणि त्याचे बाऊन्सरही दणक्यात बसत होते,’ असं ऑस्ट्रेलियन मीडियाने आपल्या अहवालांमध्ये म्हटलं आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

आयपीएलमध्येही कोलकाता कडून खेळताना हर्षित राणा प्रभावी ठरला होता आणि त्याने १३ सामन्यांमध्ये २० धावांच्या सरासरीने १९ बळी मिळवले होते. अष्टपैलू तेज गोलंदाज म्हणून हर्षितला संधी मिळू शकते. तर फलंदाजीत अभिमन्यू ईश्वरन, देवदत्त पड्डीकल, के. एल. राहुल यांच्यात स्पर्धा असेल. रोहित ऐवजी सलामीला कोण येणार हा ही प्रश्न आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.