Border – Gavaskar Trophy 2024-25 : रोहित शर्माच्या अनुपस्थितीत या खेळाडूने सलामीला यावं असं अनिल कुंबळेला वाटतं

124
Border - Gavaskar Trophy 2024-25 : रोहित शर्माच्या अनुपस्थितीत या खेळाडूने सलामीला यावं असं अनिल कुंबळेला वाटतं
Border - Gavaskar Trophy 2024-25 : रोहित शर्माच्या अनुपस्थितीत या खेळाडूने सलामीला यावं असं अनिल कुंबळेला वाटतं
  • ऋजुता लुकतुके 

नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या बोर्डर – गावसकर चषकातील (Border – Gavaskar Trophy 2024-25) पहिल्या दोन कसोटींपैकी किमान एक कसोटी सामना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळणार नाहीए. या काळात त्याची सलामीवीराची जागा कोणी घ्यावी यावर आता चर्चा सुरू झालीय. वैयक्तिक कारणामुळे भारतीय संघात उशिरा दाखल होणार असल्याचं रोहीतने आधीच बीसीसीआयला कळवलंय. आता त्याच्या अनुपस्थितीत सलामीला जयसवालबरोबर कोण जाणार हा प्रश्न आहे.

(हेही वाचा- data analyst salary : भारतामध्ये डेटा विश्लेषकांचा पगार किती असतो?)

माजी फिरकीपटू आणि कर्णधार अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) मते शुभमन गिल (Shubman Gill) हा एकेकाळचा सलामीवीर सध्या तिसऱ्या क्रमांकावर खेळतोय, तीच जागा त्याच्यासाठी योग्य आहे. तर सलामीला के एल राहुलने जावं असं मत त्याने व्यक्त केलं आहे. ‘शुभमन गिल आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर स्थिरावला आहे. त्याला तिथे चांगलं यश मिळतंय. भारताचा तो सगळ्यात चांगला युवा फलंदाज आहे. अशावेळी जमलेली घडी मी कधीच विस्कटणार नाही. मला विचारलंत, तर मी सलामीला दुसऱ्या खेळाडूचा विचार करेन. तो खेळाडू के एल राहुल असू शकतो. त्यालाही कसोटी क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. जयसवाल बरोबर त्याची जोडी जमू शकेल,’ असं कुंबळेनं जिओ सिनेमाशी बोलताना सांगितलं.  (Border – Gavaskar Trophy 2024-25)

गिल सलामीला का नको हे सांगताना कुंबळेनं त्याची तुलना राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि चेतेश्वर पुजाराशी (Cheteshwar Pujara) केली. ‘मला त्याची शैली राहुल आणि पुजाराशी मिळती जुळती दिसते. असे फलंदाज पारंपरिक दृष्ट्या तिसऱ्या क्रमांकावर योग्य आहेत. ते संघाला स्थैर्य मिळवून देतात. शुभमनचा हा दुसरा ऑस्ट्रेलिया दौरा आहे. त्याला तिथे खेळण्याचा अनुभव आहे. आता त्याने फक्त त्याच्या खेळावरच लक्ष केंद्रीत करावं. इतर विचार करू नये. त्याला स्थैर्य देण्याच्या दृष्टीने त्याच्या क्रमांकात संघानेही बदल करू नयेत,’ असं परखड मत कुंबळेनं यावेळी मांडलं. (Border – Gavaskar Trophy 2024-25)

(हेही वाचा- Jammu and Kashmir ला राज्याचा दर्जा मिळणार ? काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?)

ऑस्ट्रेलियात कुकाबुरा चेंडू वापरण्यात येतात. ते तिसाव्या ते साठाव्या षटकात खेळण्यासाठी फलंदाजांना सोपे जातात. अशावेळी शुभमन सारखा फलंदाज मैदानात हवा असा कुंबळेचा युक्तिवाद आहे. बोर्डर गावसक चषक मालिका २२ नोव्हेंबरला सिडनी इथं सुरू होणार आहे. (Border – Gavaskar Trophy 2024-25)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.