Home खेळियाड Ind vs Pak Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी भारतीय खेळाडू नेमकं काय...

Ind vs Pak Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी भारतीय खेळाडू नेमकं काय करतायत?

आशिया चषकात भारताचा पहिलाच मुकाबला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी शनिवारी पालिक्कल इथं होणार आहे.

30
Ind vs Pak Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी भारतीय खेळाडू नेमकं काय करतायत?
Ind vs Pak Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी भारतीय खेळाडू नेमकं काय करतायत?
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीपूर्वी मैदानावरील तयारी हवी तशीच थोडा मानसिक विरंगुळाही हवा. त्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये भारतीय खेळाडूंनी केलं व्हीडिओ शूट. कसं ते बघूया. आशिया चषकात भारताचा पहिलाच मुकाबला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी शनिवारी पालिक्कल इथं होणार आहे. त्यासाठी रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जोरदार सरावही करत आहे. पण, मोठ्या सामन्यापूर्वी थोडा विरंगुळाही हवा म्हणून भारतीय संघाने शुक्रवारी ड्रेसिंग रुममध्ये चक्क फोटो शूट केलं. बीसीसीआयनेही खेळाडूंचे फोटो आपल्या ट्विटर खात्यावर शेअर केले आहेत.

या फोटोशूटमुळे ड्रेसिंग रुममधील वातावरण हलकंफुलकं झालेलं पहायला मिळालं. कारण, खेळाडूंमध्ये गप्पा आणि हास्य विनोद रंगलेले दिसले. भारतीय खेळाडूंच्या फोटो सेशनचा एक व्हीडिओच बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला. ‘लाईट्स, कॅमेरा ॲक्शन! भारतीय खेळाडूंचं हेडशॉट्स सत्र फक्त तुमच्यासाठी!!’ असं ट्विट बीसीसीआयने केलं आहे.

(हेही वाचा – Hindu Rashtra : सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिंदु राष्ट्राविषयी मोठे वक्तव्य : वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत !)

शुभमन गिलचा फोटो काढताना ईशान किशन त्याला चिडवताना दिसतोय. ‘थोडं हस ना. इतका कुणावर चिडलायस?’ असं तो शुभमनला विचारतोय. अगदी दिलखुलास, मनमोकळेपणाने हस असा सल्लाही ईशान हसत हसत शुभमनला देतोय. या दोघांबरोबरच ज्येष्ठ खेळाडू विराट कोहली, रोहीत शर्मा, महम्मद सिराज, अक्षर पटेल, रवी जाडेजा, शार्दूल ठाकूर, महम्मद शामी आणि जसप्रीत बुमराही या फोटोशूटमध्ये सहभागी झाले होते. भारतीय संघाची आशिया चषक मोहीम पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने शनिवारी सुरू होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ १३ वेळा आमने सामने आले आहेत. यातील ७ सामने भारताने तर ५ पाकिस्तानने जिंकले आहेत. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
error: Content is protected !!