BCCI Cricket Academy : बीसीसीआयची नवीन क्रिकेट अकादमी इतर खेळातील खेळाडूंसाठीही खुली

BCCI Cricket Academy : पुढील महिन्यात नवीन क्रिकेट अकादमीचं अनावरण होणार आहे 

89
BCCI Cricket Academy : बीसीसीआयची नवीन क्रिकेट अकादमी इतर खेळातील खेळाडूंसाठीही खुली
BCCI Cricket Academy : बीसीसीआयची नवीन क्रिकेट अकादमी इतर खेळातील खेळाडूंसाठीही खुली
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची नवीन क्रिकेट अकादमी बंगळुरू इथं तयार होत आहे. पुढील महिन्यात या अकादमीचं उद्घाटनही होणार आहे. त्याचवेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी ही अकादमी इतर खेळातील खेळाडूंसाठीही खुली करणार असल्याचं म्हटलं आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाने एका रौप्य पदकासह एकूण ६ पदकांची कमाई केली. तेव्हाही बीसीसीआयने ही घोषणा केली होती. ऑलिम्पिक पात्र खेळाडूंनी बंगळुरूमधील क्रिकेट अकादमीचा लाभ घ्यावा असं तेव्हा सचिव जय शाह यांनी म्हटलं होतं. आता नीरज चोप्राने (Neeraj Chopra) ल्युसान इथं डायमंड्स लीग रौप्य पदक पटकावल्यावर शाह यांनीच पुन्हा एकदा नीरजसारख्या खेळाडूंसाठी अकादमी खुली असल्याचं म्हटलं आहे. (BCCI Cricket Academy)

(हेही वाचा- India vs England Test Series : भारतीय संघ पुढील वर्षी इंग्लंडमध्ये ५ कसोटी खेळणार)

नवीन एनसीए पुढील महिन्यापासून कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे आणि तिथल्या सुविधा या अत्याधुनिक आहेत.  आंतरराष्ट्रीय आकाराची मैदाने आणि ४५ इनडोअरसह खेळांच्या सुविधांसह १०० खेळपट्ट्या खेळाडूंसाठी तयार आहेत. ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव आणि दुखापतीतून सावरणाऱ्या खेळाडूंसाठी आधुनिक पुनर्वसन केंद्रही इथं उभं राहत आहे. (BCCI Cricket Academy)

जय शाह (Jay Shah) यांनी अलीकडेच मीडियाशी बोलताना सांगितलं की, नवीन एनसीए ऑलिम्पिक खेळाडूंसाठी उपलब्ध असेल. नीरज चोप्रासह अनेक भारतीय खेळाडूंनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी परदेशी प्रशिक्षक आणि प्रशिक्षण केंद्रांना प्राधान्य दिले आहे, परंतु बीसीसीआयने एनसीएचे दरवाजे उघडल्यास त्यांना मोठा फायदा होईल. (BCCI Cricket Academy)

(हेही वाचा- Mumbai Crime: रक्षकच झाला भक्षक! १७ वर्षीय मुलीवर सुरक्षा रक्षकानेच केला बलात्कार)

चिन्नास्वामी मैदानात सध्याची क्रिकेट अकादमी आहे. पण, या सुविधांचा विस्तार आवश्यक होता. तसंच जगातील प्रथम क्रमांकाच्या क्रिकेट संघासाठी या सुविधाही अपुऱ्या असल्याचं बीसीसीआयला वाटलं. त्यामुळे नवीन क्रिकेट अकादमी तयार होत असल्याचं, जय शाह यांनी सांगितलं. (BCCI Cricket Academy)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.