BCCI AGM : जय शाह यांच्याजागी बीसीसीआयचे नवीन सचिव कोण होणार?

BCCI AGM : जय शहा आयसीसीचे अध्यक्ष होणार असल्यामुळे त्यांचं सचिव पद नोव्हेंबरमध्ये रिक्त होणार आहे 

92
BCCI AGM : जय शाह यांच्याजागी बीसीसीआयचे नवीन सचिव कोण होणार?
BCCI AGM : जय शाह यांच्याजागी बीसीसीआयचे नवीन सचिव कोण होणार?
  • ऋजुता लुकतुके 

बीसीसीआयच्या ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी एका विषयावर चर्चा होतच राहिली. जय शाह नोव्हेंबरमध्ये आयसीसीत गेल्यावर त्यांच्याजागी बीसीसीआयचे नवीन सचिव कोण असतील हा तो विषय. कार्यकारिणी आणि सदस्य राज्य संघटनांनी जय शाह (Jay Shah) यांनाच त्यांचा उत्तराधिकारी नेमण्यासाठी घाई करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे बीसीसीआयचे व्यवहारही सुरळीत सुरू राहतीलं असंच सदस्यांचं म्हणणं होतं. जय शाह यांची आयसीसीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध नेमणूक झाली आहे. १ डिसेंबरला ते त्यांचा कार्यभार हातात घेतली. त्यापूर्वी बीसीसीआयचा नवीन सचिवही ठरलेला असावा अशी सगळ्यांची मागणी आहे. (BCCI AGM)

(हेही वाचा- Musheer Khan : रस्ते अपघातानंतर मुशीर खानने प्रसिद्ध केला स्वत:चा व्हीडिओ )

बीसीसीआयच्या वार्षिक सभेत अधिकृतपणे हा मुद्दा चर्चेत नव्हता. पण, खाजगीत चर्चा मात्र होत राहिली. ‘आम्ही सर्वांनी आताच्या कार्यकारिणीला विनंती केली की, नवीन सचिवाची निवड कशी करणार याचा एक कार्यक्रम लवकरात लवकर ठरावा आणि आम्हालाही त्याची कल्पना द्यावी, असं आम्ही बीसीसीआय कार्यकारिणीला सांगितलं आहे,’ असं एका राज्य क्रिकेट संघटनेचे सदस्य पीटीआयशी बोलताना म्हणाले. सध्याची परिस्थिती पाहता नवी दिल्लीतील रोहन जेटली (Rohan Jaitley), सध्याचे बीसीसीआयचे खजिनदार आशीष शेलार (Ashish Shelar), सध्याचे सहसचिव देवाजित सायकिया (Devajit Saikia) तसंच गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल (Anil Patel) यांच्या नावांची चर्चा सचिवपदासाठी होत आहे. (BCCI AGM)

आयसीसीच्या कार्यकारिणीतील बीसीसीआयचे दोन सदस्य कोण असावेत यावर मात्र वार्षिक सभेत चर्चा झाली. सध्या जय शाह (Jay Shah) आयसीसीत भारताचं प्रतिनिधित्व करतात. अनिल धुमाळ हे आयसीसीच्या कार्यकारिणीत आहेत. आता आयसीसीचे क्रिकेट संचालक आणि अतिरिक्त संचालक या पदांसाठी बीसीसीआयला दोन भारतीय व्यक्तींची निवड करायची आहे. दुबईतील महिलांची टी-२० स्पर्धा पार पडली की लगेचच आयसीसीने आपली वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली आहे. तिथे बीसीसीआयला या दोन व्यक्तींची नावं द्यायची आहेत. (BCCI AGM)

(हेही वाचा- ज्येष्ठ अभिनेते Mithun Chakraborty यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!)

दरम्यान, आयपीएलच्या कार्यकारिणीसाठी अनिल धुमाळ (Anil Dhumal) आणि अविकेत दालमिया यांची नावं शनिवारीच जाहीर झाली होती. त्यामुळे २०२५ पर्यंत तरी अनिल धुमाळच आयपीएलचे अध्यक्ष राहणार हे नक्की झालं आहे.  (BCCI AGM)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.