Ban vs Pak, 2nd Test : पाकिस्तानवरील विजयानंतर बांगलादेशच्या ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष 

Ban vs Pak, 2nd Test : ‘आमरा कोरबो जॉय’ असं म्हणत बांगला खेळाडूंनी विजय साजरा केला 

83
Ban vs Pak, 2nd Test : पाकिस्तानवरील विजयानंतर बांगलादेशच्या ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष 
Ban vs Pak, 2nd Test : पाकिस्तानवरील विजयानंतर बांगलादेशच्या ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष 
  • ऋजुता लुकतुके

बांगलादेश क्रिकेट संघासाठी हा पाकिस्तानचा दौरा खास होता. कारण, आयसीसीच्या कसोटी दर्जा असलेल्या संघाविरुद्ध त्यांनी पहिल्यांदाच मालिका जिंकली. २-० असा व्हाईटवॉशही दिला. पहिली कसोटी त्यांनी आधीच १० गडी राखून जिंकली होती. आता दुसऱ्या कसोटीत शेवटच्या दिवशी विजयासाठी आवश्यक १८६ धावा बांगला संघाने ६ गडी राखून पूर्ण केल्या. त्यानंतर रावळपिंडी मैदानात एकच जल्लोष सुरू झाला. आधीच देशात राजकीय अराजक सुरू असल्यामुळे कुणाचीही मनस्थिती फारशी चांगली नाहीए. अशावेळी या विजयाने एकप्रकारचा आनंदाचा शिडकावा खेळाडू आणि देशवासीयांवर केला आहे. खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्ये गोल रिंगण करत नृत्य केलं. जोन बेझचं ‘वी शाल ओव्हरकम’ या गाण्याचं बंगाली रुपांतरण खेळाडू गाऊ लागले. (Ban vs Pak, 2nd Test)

(हेही वाचा- Konkan Railway: खोळंबलेल्या एसटीमुळे कोकण रेल्वेचा चाकरमान्यांना मदतीचा हात; आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा)

‘आमरा कोरबो जॉय,’ या गाण्याचे सूर किती तरी तास ड्रेसिंग रुममध्ये घुमत होते. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात बांगलादेशने अव्वल कामगिरी केली. (Ban vs Pak, 2nd Test)

 दुसरीकडे, पाकिस्तानची पराभवांची मालिका खंडित होण्याचं नाव घेत नाहीए. मागच्या १० कसोटी पाकिस्तानने विजयाशिवाय काढल्या आहेत. यात ६ पराभव आणि ४ अनिर्णित सामन्यांची नोंद आहे. त्यांच्यासाठी आणखी एक नीच्चांकी बिंदू म्हणजे कसोटी खेळणाऱ्या दहाही संघाविरुद्ध घरची मालिका गमावण्याची कामगिरी करणारा बांगलादेशनंतरचा हा दुसरा संघ ठरलाय. रावळपिंडीत पावसाने व्यत्यय आणल्यामुळे चौथ्या दिवशीचा खेळ पूर्ण होऊ शकला नव्हता. पण, पाचव्या दिवशी चहापानापूर्वी २० मिनिटं शकिब अल हसनने विजयी चौकार मारून बांगलादेशच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्यानंतर मैदानावर बांगलादेशी खेळाडूंचा एकच जल्लोष सुरू झाला. (Ban vs Pak, 2nd Test)

(हेही वाचा- Veer Savarkar : देवळाली कॅम्प येथील डॉ. सुभाष गुजर विद्यालयाला वीर सावरकर यांची मूर्ती भेट)

बांगलादेशचा हा ३३ वा परदेश दौरा होता. यात परदेशात मालिका जिंकण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. या विजयानंतर बांगलादेशच्या संघाचं मायदेशातही जल्लोषात स्वागत होणार आहे. (Ban vs Pak, 2nd Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.