Badminton Competition : राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे मुंबईत आयोजन

83
Badminton Competition : राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे मुंबईत आयोजन
Badminton Competition : राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे मुंबईत आयोजन

गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे २९ सप्टेंबर २०२४ ते ५ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे (Badminton Competition) आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन (MBA)च्या अंतर्गत येणाऱ्या बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगर यांच्यावतीने ‘शटलक्रेज’ संस्थेच्या सहाय्याने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Sanjay Raut यांनी दाखवला सरन्यायाधीशांवर अविश्वास आणि झाले ट्रोल..)

बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगर ( BAMU) यांच्याकडून गेल्या वर्षभरात अनेक उत्तम बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याला खेळाडूंचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन (MBA)च्या अधिपत्याखाली येणाऱ्या बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगर ( BAMU) यांच्यावतीने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा गोरेगाव स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी ‘शटलक्रेज’ या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. २९ सप्टेंबर २०२४ ते ५ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान ही स्पर्धा होईल.

सुप्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू प्रथम अर्जुन अवॉर्ड विजेता कै. नंदू नाटेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘योनेक्स- सनराइज महाराष्ट्र राज्य सीनियर आंतरजिल्हा (सांघिक) आणि राज्य बॅडमिंटन स्पर्धा २०२४’चे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेला गोरेगाव स्पोर्ट्स क्लबकडून विनामूल्य क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे (MBA) अध्यक्ष अरुण लखानी आणि सचिव श्रीकांत वाड यांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा होणार आहे.‌

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.