Alex Ferguson : ॲलेक्स फर्ग्युसन सोडणार मॅन्चेस्टर युनायटेडची साथ?

Alex Ferguson : फर्ग्युसन सध्या क्लबचे जागतिक अँबेसिडर आहेत.

131
Alex Ferguson : ॲलेक्स फर्ग्युसन सोडणार मॅन्चेस्टर युनायटेडची साथ?
  • ऋजुता लुकतुके

इंग्लिश प्रिमिअर लीगमधील आघाडीचा असलेला क्लब मँचेस्टेर युनायटेडचे माजी मुख्य प्रशिक्षक ॲलेक्स फर्ग्युसन (Alex Ferguson) क्लबबरोबरचा आपला ४ दशकांचा संसार यंदा मोडू शकतात. ८३ वर्षीय फर्ग्युसन यांच्या कार्यकाळात मॅनयुने १३ वेळा इंग्लिश प्रिमिअर लीग जिंकली. तर दोनदा चॅम्पियन्स लीगचं विजेतेपद पटकावलं. २७ वर्षं ते मॅनयुचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यानंतर २०१३ पासून ते क्लबचे जागतिक अँबेसिडर आहेत. त्यासाठी त्यांना क्लबकडून वर्षाला २.६ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका मेहनताना मिळतो. पण, आता क्लबने खर्च कमी करण्याच्या योजना सुरू केल्या आहेत.

(हेही वाचा – 5 व्या National Water Award 2023 विजेत्यांची घोषणा; महाराष्ट्रातील ‘या’ संस्थांची निवड)

या योजनेचा भाग म्हणून फर्ग्युसन (Alex Ferguson) यांना या पदावरून हटवण्यात येणार आहे. दोघांनाही हा करार मान्य आहे. अर्थात, क्लबचे कार्यकारिणी सदस्य म्हणून ते अजूनही कार्यरत असतील. पण, त्यांना मतदानाचा हक्क नसेल. मॅन्चेस्टर युनायटेड क्लबची मालकी यावर्षीच्या सुरुवातीला इनिऑस या कंपनीकडे आली आहे. त्यांच्याकडील हिस्सेदारी तुलनेनं कमी असली तरी हीच कंपनी क्लबची देखभाल बघते.

(हेही वाचा – MSP Hike : मोदी सरकारचे दिवाळीआधी शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट)

२०२४ मध्ये क्लबला १४८ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा तोटा झाला आहे. सलग पाच वर्षं कंपनी तोटाच सहन करत आली आहे. त्यामुळे खर्च कमी करण्याचे उपाय कंपनीने सुरू केले आहेत. खेळाडू आणि स्टाफ मिळून २५८ जणांना आतापर्यंत क्लबने काढून टाकलं आहे. त्याचबरोबर मैदानावरील क्लबची कामगिरीही पुरेशी उत्साहवर्धक नाही. सध्या लीगमध्ये संघ १४ व्या क्रमांकावर आहे. हंगामाची सुरुवातच धिमी झाली आहे आणि त्यामुळे सध्याचे प्रशिक्षक एरिक हॅग यांच्यावरही दडपण वाढलं आहे. येत्या शनिवारी क्लबचा पुढचा सामना ब्रेंटफोर्डबरोबर आहे. (Alex Ferguson)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.