Ajay Ratra : राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीत सलिल अंकोलाच्या जागी अजय रात्रा 

61
Ajay Ratra : राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीत सलिल अंकोलाच्या जागी अजय रात्रा 
Ajay Ratra : राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीत सलिल अंकोलाच्या जागी अजय रात्रा 
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेटच्या राष्ट्रीय निवड समितीत अजय रात्राची (Ajay Ratra) निवड करण्यात आली आहे. रात्रा सलिल अंकोलाची जागा घेईल. नेमणुकीनंतर लगेचच अजय रात्राने पदभार स्वीकारला आहे. अजित आगरकरच्या (Ajit Agarkar) अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय निवड समिती सध्या कार्यरत आहे. पण, यात आगरकर आणि सलिल अंकोला हे दोनही सदस्य पश्चिम विभागाचे होते. उलट उत्तर विभागाचा एकही सदस्य या समितीत नव्हता. हे संतुलन कायम राखण्यासाठी बीसीसीआयने हा बदल केला आहे. देशांतर्गत क्रिकेट हंगाम सुरू झालेला असताना आणि महत्त्वाची दुलिप करंडक स्पर्धा एका दिवसावर आली असताना तातडीने हा बदल करण्यात आला आहे.

(हेही वाचा- World Test Championship : कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना लॉर्ड्सवर ‘या’ दिवशी रंगणार)

‘बीसीसीआयच्या (BCCI) क्रिकेट सल्लागार समितीने निवड समितीचे नवीन सदस्य म्हणून अजय रात्रा (Ajay Ratra) यांच्या नावाची शिफारस केली आहे. रात्रा सलिल अंकोला यांची जागा घेतील. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती आपलं कामकाज सुरूच ठेवेल,’ असं बीसीसीआयने अधिकृत पत्रकात म्हटलं आहे.

अजय रात्रा हे भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज आहेत. ४२ वर्षीय अजय रात्रा (Ajay Ratra) हरयाणाच्या फरिदाबादचे आहेत. आणि भारतीय संघातून ६ कसोटी तसंच १२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ९९ प्रथमश्रेणी सामन्यांचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. २००२ मध्ये पहिली कसोटी खेळणाऱ्या रात्राने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सेंट जॉन्स इथं वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी शतक ठोकण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे. आता निवड समितीत उत्तर विभागाचं प्रतिनिधित्व अजय रात्रा करतील.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.