२९ ऑगस्ट रोजी National Sports Day कोणाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो?

110
२९ ऑगस्ट रोजी National Sports Day कोणाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो?
२९ ऑगस्ट रोजी National Sports Day कोणाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो?

दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. खेळ हा जवळजवळ प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला कोणतातरी क्रीडाप्रकार आवडत असतो. काहीजण फक्त छंद म्हणून खेळतात, तर काही जण करिअर म्हणून आपल्या आवडत्या खेळाची निवड करतात आणि आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देतात. (National Sports Day)

खेळामध्ये करिअर करणारे खेळाडू आपल्या आवडत्या खेळातल्या प्रसिद्ध खेळाडूंना आपला आदर्श मानून त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालतात. आपल्या देशामध्ये खेळांचा खूप मोठा वारसा आहे. त्यांतल्या हॉकी या खेळाचे दिग्गज खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा राष्ट्रीय क्रीडा दिनाशी थेट संबंध येतो. हॉकीचे जादूगार म्हणून मेजर ध्यानचंद यांना ओळखलं जातं. (National Sports Day)

(हेही वाचा- उभारण्यात येणारा शिवरायांचा नवा पुतळा लौकिकाला साजेसा हवा, पैसा कमी पडू देणार नाही: CM Eknath Shinde)

मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ साली उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज येथे झाला. त्यावेळी ध्यानसिंग असं त्यांचं नाव ठेवण्यात आलं होतं. (National Sports Day)

दुसऱ्या विश्वयुद्धापूर्वीच्या वर्षांमध्ये हॉकीच्या या खेळात मेजर ध्यानचंद यांनी एकेकाळी लोकांच्या मनावर वर्चस्व गाजवलं होतं. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी संघाचे स्टार प्लेअर होते. त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ सालच्या समर ऑलिंपिकमध्ये भारताला सलग तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदके मिळवून दिली. तसंच त्यांनी सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्यास महत्वाची भूमिका बजावली. (National Sports Day)

(हेही वाचा- Crime News : गोमांसाची तस्करी करणारा कासमअली दोन वर्षांसाठी तडीपार)

म्हणून २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात बाजी खेलो इंडिया चळवळ सुरू केली त्यामध्ये वेगवेगळ्या क्रीडा योजना सुरू करण्यासाठी कित्येक वर्षांपासून या दिवसाचा वापर केला जातो. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळावं यासाठी २९ ऑगस्ट हा ध्यानचंद यांचा जन्मदिन दरवर्षी देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. (National Sports Day)

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी हरियाणा, पंजाब आणि कर्नाटक यांसारखी राज्ये जीवनातलं खेळांचं महत्त्व याविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आणि चर्चासत्रं आयोजित करतात. (National Sports Day)

(हेही वाचा- Jalgaon News: जखमी गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू; मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी)

आणखी एक म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला जातो. हा पुरस्कार वितरण समारंभ राष्ट्रपती भवनात आयोजित केला जातो. या समारंभाच्या वेळी भारताचे राष्ट्रपती सगळ्या मान्यवर खेळाडूंना स्वहस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करतात. (National Sports Day)

१९२६ ते १९४८ सालापर्यंतच्या आपल्या हॉकीच्या करकीर्दीमध्ये मेजर ध्यानचंद यांनी भारतातर्फे हॉकीचे १८५ सामने खेळून ४०० पेक्षा जास्त गोल केले होते. मेजर ध्यानचंद हे सर्वकाळातले महान हॉकी खेळाडू म्हणून ओळखले जातात. (National Sports Day)

(हेही वाचा- PM मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या SPG मध्ये लष्कराच्या जवानांचा समावेश का केला जात नाही?)

१९५६ साली ते भारतीय सैन्याच्या पंजाब रेजिमेंटमध्ये मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले. ते मेजर या पदावर होते, म्हणून त्यांना मेजर ध्यानचंद असं म्हटलं गेलं. १९५६ साली भारत सरकारने त्यांना भारतातला तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं. (National Sports Day)

२९ ऑगस्ट या दिवशी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी हॉकीच्या दिग्गजांचा सन्मान करण्यासाठीही राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. (National Sports Day)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.