Uday Kotak Net Worth : भारतातील सगळ्यात श्रीमंत बँकरची मालमत्ता तुम्हाला ठाऊक आहे?

Uday Kotak Net Worth : भारतात खाजगी बँकेचं साम्राज्य उभं करणारा उद्योजक

85
Uday Kotak Net Worth : भारतातील सगळ्यात श्रीमंत बँकरची मालमत्ता तुम्हाला ठाऊक आहे?
Uday Kotak Net Worth : भारतातील सगळ्यात श्रीमंत बँकरची मालमत्ता तुम्हाला ठाऊक आहे?
  • ऋजुता लुकतुके

गुजराती कुटुंबातील मुलं नेहमी व्यवसायाचाच विचार करतात. पण, सुरेश कोटक या बँक अधिकाऱ्याचा मुलगा थोडासा वेगळा होता. उच्चमध्यमवर्गीय घरातून आलेला हा मुलगा उद्योगाचीच स्वप्न बघत होता. पण, त्याला स्वत:ची वित्तीय संस्थाच सुरू करायची होती. त्यासाठी त्याने फार वेळही नाही घेतला. डोक्यात कल्पना तयार असेल आणि उद्योजकतेचं बाळकडूही असेल तर कदाचित निर्णय कृतीत आणणं सोपं जातं. (Uday Kotak Net Worth)

सिडनहॅम महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतील पदवी आणि जमनालाल बजाज या व्यवस्थापन शास्त्रातील अग्रगण्य संस्थेतून एमबीए केल्यावर या मुलाने जराही वेळ न दवडता १९८२ मध्येच कोटक कॅपिटल फायनान्स लिमिटेड ही कंपनी सुरू केली. उद्योगांना वित्त पुरवठा हे अर्थातच या कंपनीचं मुख्य काम होतं. त्यासाठी जागतिक स्तरावर नेटवर्क उभं करण्याचं या तरुणाचं स्वप्न होतं. त्या दिशेनं प्रवास सुरू झाला. १९८५ मध्येच या मुलाने महिंद्रा समुहाबरोबर संयुक्त भागिदारीचा करार करून रिझर्व्ह बँकेकडे बँकिंग परवाना मागितला. स्वत:ची कोटक महिंद्रा बँक सुरू केली. (Uday Kotak Net Worth)

(हेही वाचा- …तोपर्यंत तुम्ही गांभीर्याने घेणारच नाही का? बलात्कार प्रकरणावरून Bombay High Court ची सरकारवर आगपाखड)

महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा पाडाव आला तो २०१४ साली. यावर्षी या तरुणाने आयएनजी वैस्य ही भारतातील एक खाजगी बँक आपल्या उगवत्या साम्राज्यात विलीन केली. त्यासाठी २.४ अब्ज अमेरिकन डॉलर मोजले. या व्यवहाराची भारतीय वित्त बाजारात खूपच चर्चा झाली. तोपर्यंत उगवता उद्योजक असलेल्या या तरुणाचं नाव बँकिंग क्षेत्रात नावाने घेतलं जाऊ लागलं. त्याला त्या वर्षीचा अर्नेस्ट अँड यंग उद्योजकता पुरस्कार मिळाला. (Uday Kotak Net Worth)

हे घडून आलं ते आधीचा तरुण राहिला नव्हता. त्याचं वयही आतचा ४५ च्या पुढे सरकलं होतं. त्याच्या ताफ्यात आयएनजी बँकेबरोबरच कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड, कोटक अल्टरनेट असेट्स मॅनेजर्स अशा आणखीही कंपन्या उभ्या राहिल्या होत्या. अशा या उद्योजकाचं नाव आहे उदय कोटक. आयएनजी वैश्य बँक ताब्यात आल्यानंतर कोटक महिंद्रा ही त्यांनी सुरू केलेली खाजगी बँक देशातील तिसरी मोठी खाजगी बँक झाली आहे. बाजारातील भागभांडवलाच्या निकषावर बँकेला हा क्रमांक मिळाला आहे. (Uday Kotak Net Worth)

(हेही वाचा- CM Eknath Shinde: आता ‘लाडका शेतकरी’ योजना आणणार)

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, कोटक यांनी आपला या बँकेतील हिस्सा ३० टक्क्यांवर सिमित ठेवला आहे. पण, तरीही या घडीला त्यांची मालमत्ता ही १,३३३० कोटी अमेरिकन डॉलर इतकी आहे. फोर्ब्स यादीत जगातील अब्जाधीशांच्या क्रमवारीत त्यांचा क्रमांक १४४ वा लागतो. (Uday Kotak Net Worth)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.