Triumph Scrambler 400 X : ट्रायंफची ही कूल एँड केपेबल बाईक पाहिलीत का?

ट्रायंफ मोटार बाईक कंपनी २०१४ च्या सुरुवातीला आपली नवीन बाईक भारतीय बाजारपेठेत उतरवत आहे. तिचं कूल डिझाईन आणि केपेबल इंजिन यामुळे आताच तिची चर्चा आहे. पाहूया या बाईकचे फिचर्स आणि डिझाईन 

29
Triumph Scrambler 400 X : ट्रायंफची ही कूल एँड केपेबल बाईक पाहिलीत का?
Triumph Scrambler 400 X : ट्रायंफची ही कूल एँड केपेबल बाईक पाहिलीत का?
  • ऋजुता लुकतुके

ट्रायंफ मोटार बाईक कंपनी २०१४ च्या सुरुवातीला आपली नवीन बाईक भारतीय बाजारपेठेत उतरवत आहे. तिचं कूल डिझाईन आणि केपेबल इंजिन यामुळे आताच तिची चर्चा आहे. पाहूया या बाईकचे फिचर्स आणि डिझाईन. (Triumph Scrambler 400 X)

‘कूल अँड केपेबल’ अशी या बाईकची टॅगलाईन आहे आणि तीच तिची जागतिक ओळखही आहे. म्हणजे आधुनिक आणि तरुणांना आकर्षित करणारं कूल डिझाईन आणि जास्त शक्तीचं इंजिन असल्यामुळे ती केपेबलही आहे, असं कंपनीला सांगायचं आहे. (Triumph Scrambler 400 X)

आताही ट्रायंफ स्क्रँबलर ४०० एक्स ही नवीन बाईक याच श्रेणीतील आहे. शिवाय किमतीच्या बाबतीत प्रिमिअम श्रेणीतील असली तरी किफायतशीर आहे. लिक्विड कूल आणि ४ वॉल्व्ह असलेलं एक सिलिंडरचं इंजिन या गाडीत आहे. त्याची क्षमता आहे ४०० सीसी. यातून ४० पीएस इतकी शक्ती निर्माण होऊ शकते. या बाईकमध्ये ६ स्पीड गिअर-बॉक्स आहे. (Triumph Scrambler 400 X)

१३ लीटरची पेट्रोलची टाकी यात आहे आणि गाडी १३ किलोमीटर प्रतीलीटर चालत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. बाईकचं डिझाईन आधुनिक असलं तरी स्पीडोमीटर ॲनलॉग आहे. पण, एलईडी पॅनलही देण्यात आलं आहे. या बाईकला १२ महिन्यातून एकदाच सर्व्हिसिंग करावं लागेल, असं कंपनीने म्हटलं आहे. (Triumph Scrambler 400 X)

(हेही वाचा – Preeti Dighe : मुंबई महापालिकेच्या शिरपेचात ताज)

ही बाईक फक्त एकाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. तिची किंमत २,६२,००० रुपयांपासून सुरू होते. या बाईकचा लूक बघितला तर ती लांब पल्ल्याच्या आणि ओबडधोबड राईडसाठी बनलेली आहे हे लगेच कळतं. कारण, डिझाईनिंगमध्ये या बाईकला हेडलाईट शिल्ड, रेडिएटर, सम्प गार्ड, हँड गार्ड कसंच नेहमीपेक्षा मोठे मडगार्ड देण्यात आले आहेत. (Triumph Scrambler 400 X)

खाकी हिरवा, फँटम काळा तसंच कार्निव्हल लाल अशा तीन रंगात ती उपलब्ध आहे आणि वापर आणि फिचरच्या तुलनेत तिची किंमत अडीच लाखांच्या पुढे असल्यामुळे ती किफायतशीर मानली जात आहे. पुढील वर्षी मार्च पर्यंत कंपनी ही बाईक लाँच करणार आहे. ट्रायंफच्या स्क्रँबलर प्रकारातील ही सगळयात कमी किमतीची बाईक असेल. (Triumph Scrambler 400 X)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.