theme of 78th independence day: स्वातंत्र्यदिन चिरायू होवो..! यंदाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाची थीम काय होती? घ्या जाणून

71
theme of 78th independence day: स्वातंत्र्यदिन चिरायू होवो..! यंदाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाची थीम काय होती? घ्या जाणून
theme of 78th independence day: स्वातंत्र्यदिन चिरायू होवो..! यंदाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाची थीम काय होती? घ्या जाणून

सध्या देशभरात स्वातंत्र्यदिनाची लगबग पाहायला मिळत आहे. भारत देश यंदा १५ ऑगस्ट २०२४ ला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार करण्यात आला. या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, कॉलेज, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि ऑफिसमध्ये देशभक्तीवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. स्वातंत्र्यदिनाचा हा उत्सव दरवर्षी विविध थीमच्या आधारे साजरा केला जातो. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम काय आहे? आणि या वर्षी स्वातंत्र्यदिनाला काय खास असणार? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (theme of 78th independence day)

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम

मागील वर्षी स्वातंत्र्यदिनाची थीम ही ‘राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम’ अशी होती. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाची थीम ही ‘विकसित भारत’ (Vikasit Bharat 2024) अशी असणार आहे. याच थीमवर आधारित स्वातंत्र्यदिनाचा उत्सव देशभरात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्याची १०० वर्षे २०४७ मध्ये पूर्ण होत असताना, भारताला विकसित देश बनवणे, हे त्या थीम मागील ध्येय आहे.

(हेही वाचा – Kala Ghoda परिसर सप्टेंबरपासून पादचारी क्षेत्रात बदलणार)

स्वातंत्र्यदिनाला काय असणार खास?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनाला सकाळी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पोहचतील. त्यानंतर, भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला सुरूवात होईल. या ऐतिहासिक स्थळावर पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतात. त्यांच्या आगमनावेळी सशस्त्र दल आणि पोलीस दलाच्या जवानांकडून औपचारिक ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला जातो.

त्यानंतर, पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतात. देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि एकतेचे प्रतिक असलेला हा अतिशय महत्वाचा क्षण असतो. ध्वजारोहण सोहळ्यानंतर, ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत म्हटले जाते. त्यासोबतच २१ तोफांची सलामी दिली जाते. हा एक लष्कराचा पारंपारिक सन्मान आहे. राष्ट्रगीत आणि ध्वजाला सलामी देणे या दोन्ही गोष्टी देशाच्या प्रती आदर आणि सन्मानाचे प्रतिनिधित्व करतात. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतात.

त्यानंतर, भारताची सांस्कृतिक विविधता, लष्करी सामर्थ्य आणि विविध तंत्रज्ञान दर्शवणारी भव्य परेड सादर केली जाते. हा संपूर्ण सोहळा रोमांचकारी असतो. भारतीय सशस्त्र दल, भारतीय पोलीस आणि राष्ट्रीय कॅडेट कॉर्म्सच्या विविध रेजिमेंटच्या तुकड्या राष्ट्रीय अभिमान आणि एकदा दर्शवण्यासाठी या परेडमध्ये सहभागी होतात.

(हेही वाचा – खगोलप्रेमींसाठी Super Blue Moon पाहण्याची पर्वणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.