Shivrajyabhishek Sohala 2023: छत्रपती शिवाजी महाराज आजच्या तरुणींच्या नजरेतून…

117
Shivrajyabhishek Sohala 2023: छत्रपती शिवाजी महाराज आजच्या तरुणींच्या नजरेतून...
Shivrajyabhishek Sohala 2023: छत्रपती शिवाजी महाराज आजच्या तरुणींच्या नजरेतून...

प्रियांका शिंदे

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला यंदा ३५० वर्षे पूर्ण होणार आहेत. ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. शिवरायांच्या या स्वराज्याला हिंदू पदपादशाही म्हणून संबोधले जाते. पण यंदा शिवरायांचा ३५०वा राज्याभिषेक सोहळा साजरा करताना मनात एक खंत निर्माण झाली आहे ती म्हणजे शिवचरित्रातून शिकण्यात आलेल्या गोष्टी युवा वर्ग विसरत चालला आहे. आधुनिकतेच्या नावाखाली भरकटतो आहे. कधी कोण आपल्याला वश करत आहे, हेच कळेनासे झाले आहे आणि त्यानंतर जे घडत आहे ते मात्र हादरवून टाकणारे असते. याचे मूळ कारण म्हणजे शिवरायांनी शिकवलेला स्वधर्माचा अभिमान आणि स्त्रियांचा आदर हे युवा वर्ग विसरत चालला आहे. मी असे का म्हणतेय, कारण काही दिवसांपूर्वी संपूर्ण हिंदुस्थानला हादरवून सोडणारे श्रद्धा आणि साक्षी हत्याकांड! ‘द केरळा स्टोरी’ चित्रपटाला प्रपोगंडा म्हणणारे, ‘लव्ह जिहाद’ कपोलकल्पित आहेत, असे म्हणणाऱ्यांची फौज तयार होत आहे. (Shivrajyabhishek Sohala 2023)

जहन में किसने जहर डाला

साक्षी हत्याकांडसारख्या घटना घडल्यानंतर ‘द केरळा स्टोरी’ या चित्रपटातील ‘पागल परिंदा’ गाण्यातील काही ओळी सतत ऐकू येऊ लागल्या आहेत. ‘जहन में किसने जहर डाला, न जमीन मिली न फलक मिला, है सफर में अंधा परिंदा’ या ओळी मनावर बिंबू लागल्या आहेत.

साक्षी नावाच्या हिंदु मुलीसमोर स्वतः हिंदू असल्याचे दाखवून साहिलने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. साहिल त्याच्या हातावर भगवा धागा बांधत असल्यामुळे साक्षीला त्याचे खरे रुप दिसलेच नाही. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून साक्षीचे जबरदस्तीने धर्मांतरण करू पाहणाऱ्या साहिल नावाच्या नराधमाचा जेव्हा खरा चेहरा समोर आला, तेव्हा तिने त्याच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली. पण साहिलला हे पचनी पडले नाही. भर रस्त्यात साहिलने साक्षीवर चाकूचे २१ वार करून ६ वेळा दगडाने ठेचून तिला संपवून टाकले. यापूर्वीही अशाच प्रकारचे श्रद्धा वालकर प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात अफताब नावाच्या नराधमाने श्रद्धा वालकर हिचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवून तिची निर्घृणपणे हत्या केली होती. अशा भयानक हत्याकांड घडणाऱ्या याच हिंदुस्थानात असे एक ‘स्वराज्य’ होऊन गेले जिथे स्वराज्यातील व परराज्यांतील स्त्रियांचा आदर केला जात होता आणि स्वधर्मासाठी लढले जात होते. याच स्वराज्यात अशा काही घटना घडल्या की ‘चौरंगा’ ही कडक शिक्षा केली जात होती. पण या इतिहासातून कोणीच बोध घेताना दिसत नाही.

स्वराज्यात अफताब आणि साहिल यांचे काय झाले असते?

शिवरायांच्या स्वराज्यात गद्दारांना कडेलोट आणि बलात्कार करणाऱ्या आरोपींना त्याच्या शरीराचा ‘चौरंग’ करून फार कडक शिक्षा दिली जात होती. या स्वराज्यात एकदा पुणे जिल्ह्यातील रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ भिकाजी गुजरने स्त्रीसोबत गैरवर्तन केल्याचे महाराजांना समजताच त्यांनी तातडीने त्याला बोलावून घेतले. भिकाजी गुजर हा अनेक गुन्ह्यासाठी कुप्रसिद्ध असल्यामुळे त्या पाटलाला कोण अडवणार आणि कशी शिक्षा देणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण महाराजांनी न्यायनिवाडा करण्यासाठी सर्वांसमोर त्याची चौकशी केली. चौकशीमध्ये त्याचा गुन्हा सिद्ध झाला. या गुन्ह्यामध्ये महाराज कोणती शिक्षा देणार याची कल्पना कोणालाही नव्हती. पण हे दुष्कर्म पुन्हा होणार नाही याचा विचार करून शिवरायांनी कठोर शिक्षा देण्याचा आदेश दिला. तसेच त्याची त्वरित पाटीलकी जप्त केली. बाबाजीला ‘चौरंग’ करायचा म्हणजेच हात पाय कलम करण्याची शिक्षा सुनावली. हात पाय कलम केल्यानंतर रक्तस्त्राव होऊन दगावू नये यासाठी जखमा गरम तुपात बुडवल्या गेल्या. गैरकृत्याला माफी नाही मग तो कोणीही असो हे सर्वांना ध्यानात ठेवण्यासाठी ‘चौरंग’ शिक्षा बाबाजीला दिली गेली. (Shivrajyabhishek Sohala 2023)

(हेही वाचा – Shivarajabhishek Sohala : शिवराज्याभिषेक महोत्सव : असाधारण कर्तृत्वाचा जागर)

शिवरायांनी काय केले आणि आपण काय करतो?

शिवरायांनी स्वराज्यातील आणि शत्रूंच्या स्त्रियांना देखील नेहमीच मानाने वागवले. मोगली फौजेतील रायबाघीण शिवरायांच्या विरोधात उमरखिंडीत लढली. या लढाईत तिचा पराभव झाला आणि ती पकडली गेली. पण महाराजांनी तिच्या हुद्यानुसार तिला वागणूक दिली. तिचा आदर-सत्कार करून तिला तिच्या छावणीत सुखरुप पाठवले होते. तसेच कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या शिवरायांच्या विरोधात लढल्या होत्या. त्या सावित्रीबाईंचा देखील शिवरायांनी सन्मान केला. उलट सावित्रीबाईंचा अवमान करणाऱ्या स्वतःच्या सरदारांना महाराजांनी शिक्षा केली. शिवरायांच्या स्वराज्यातील अशी अनेक उदाहरणे आहेत.

हेच आजच्या काळात पाहिले तर, महिलेने एखाद्या गोष्टीचा विरोध जरी केला तरी थेट तिला संपवले जात आहे. महाराजांनी ज्याप्रमाणे महिलांचा आदर केला, त्याप्रमाणे आदर सध्याच्या काळात हाताच्या बोटावर मोजण्या इतकेचे पुरुष करत आहेत. फक्त जय शिवाजी, जय भवानी घोषणा देऊन शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करून स्वतःला मावळे समजणाऱ्यांनी आपण किती महिलांचा आदर-सन्मान करतो, याची पारख केली पाहिजे.

मुलींनी शस्त्र विद्या घेण्याची गरज (Shivrajyabhishek Sohala 2023)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महिलाविषयक धोरणामुळे नंतरच्या काळात आपल्याला लढवय्या स्त्रिया पहायला मिळाल्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराणी येसूबाई, राजाराम महाराजांच्या महाराणी ताराराणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी निर्भीडपणे पुढे आल्या. हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन या थोर महाराण्यांनी रणांगण गाजवले. सिंहासनावर बसून राज्यकारभार चालवला आणि दाखवून दिले की महिला काय करू शकतात. त्यामुळे आजच्या काळातील महिलांनी देखील पदवी घेण्याबरोबर शस्त्रास्त्र विद्या घेतली पाहिजे.

स्वधर्म जाणून घ्या

शिवरायांनी स्वधर्माचा अभिमान जागृत ठेवण्यासाठी शिवमुद्रा, मुद्रा आणि भगव्या झेंड्याचा वापर केला. महाराजांच्या कार्यालयीन कामकाजाचा पत्रव्यवहार करताना मुद्रा उमटवली जात असे. शिवमुद्रा ही मुख्य मुद्रा होती तर मर्यादा मुद्रा ही पत्रातला मजकूर संपल्याची खूण मानली जायची.

शिवमुद्रेवरील मजकूरांचा अर्थ

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोःशिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते

अर्थ – प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंदनीय असणारी, शहाजी राजेंचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभते.

शिवमुद्रेप्रमाणे ‘भगवा’ हा आपल्या साम्राज्याचे प्रतीक म्हणून शिवरायांनी स्वीकारले होते. भगवा म्हणजे त्यागाचे प्रतीक. भगवा म्हणजे भक्तीचे प्रतीक आणि शक्तीचे. शिवमुद्रा, भगवा या गोष्टी स्वर्धमाचा अभिमान जागृत ठेवण्यासाठी शिवरायांनी स्वीकारल्या. हाच स्वधर्म आजच्या तरुणींनी जाणून घेण्याची गरज आहे. तरुणींना या स्वधर्माचा विसर पडल्यामुळे त्या इतर धर्मांकडे आकर्षित होत आहेत. मग मुसलमान त्याचा गैरफायदा घेऊन धर्मांतरीत करत आहेत. याला आळा घालण्यासाठी स्वधर्म वेळीच जाणून घ्या. नाहीतर उद्या आपल्यापैकी कोणीतरी रुपाली चंदनशिवे, निकिता तोमर, श्रद्धा वालकर आणि साक्षी व्हायला वेळ लागणार नाही. अगर नाम झूठा बताता है तो प्यार नहीं जिहाद है, अगर पहचान झूठी बताता है तो प्यार नहीं जिहाद है, अगर नकली कलावा बांधकर आता है तो प्यार नहीं जिहाद है, अगर धर्म परिवर्तन के लिए दबाव डालता है तो प्यार नहीं जिहाद है, हे भाजपाचे कपिल मिश्रा यांचे शब्द सगळ्या मुलींनी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.